कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: रांगोळी, सजावटीच्या माध्यमातून कोरोनाचा संदेश

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: रांगोळी, सजावटीच्या माध्यमातून कोरोनाचा संदेश

माधुरी रानभरे यांचा बाप्पा

कराड येथे राहणाऱ्या माधुरी रानभरे यांनी सर्व जगावर जे कोरोना संकट आले आहे, त्याच्याशी आपण कसा लढा द्यावा हे गणपती सजावटीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मास्कचा वापर करावा, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, हातात हात देवू नये, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे यासारख्या खबरदारींच्या उपायांना सजावटीच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे निसर्गाने जे दिले ते परत घेतले. पृथ्वीने मोकळा श्वास घेतला. पशू, पक्षी मुक्त फिरू लागले आणि प्रदूषण खूप कमी झाले. पण दुसरीकडे हॉटेल, मॉल सिनेमागृह, शाळा बंद झाल्या. शिक्षण ऑनलाईन झाले. लहान मुलांचे बालपण हिरावून घेतले अशा सर्व गोष्टींवर माधुरी रानभरे यांनी प्रकाश टाकला आहे.

एका मूर्तीतून त्यांनी डॉक्टर, सफाई कामगार अशा कोविड योद्ध्यांना सलाम केला आहे. तर गौरी आणि रांगोळी मधून हाच संदेश दिला आहे. ही सर्व सजावट आणि मूर्ती इको फ्रेंडली साहित्यापासून तयार केलेली आहे. मुर्ती शाडूची आणि बाकी पुठ्ठा आणि लाकूड वापरले आहे.

First Published on: August 27, 2020 11:36 PM
Exit mobile version