‘कोरोना विघ्नहर्ता स्पर्धेचा निकाल जाहीर; हे आहेत विजेते

‘कोरोना विघ्नहर्ता स्पर्धेचा निकाल जाहीर; हे आहेत विजेते

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा

आपलं महानगर आणि माय महानगरतर्फे गणेशोत्सवादरम्यान गणेश सजावटीसंदर्भात स्पर्धा घेण्याचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या दोन वर्षात इको फ्रेंडली बाप्पा या स्पर्धेला गणेशभक्तांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यंदा या स्पर्धेच्या संकल्पनेत थोडासा बदल करत ही स्पर्धा इको फ्रेंडली उत्सव आणि सोबत कोरोनाचा एखादा सकारात्मक संदेश देणारी सजावट स्पर्धा म्हणून घेण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरातून एकूण २६ गणेश भक्तांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. सर्वांनीच कोरोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर व्हावे, यासाठी बाप्पाकडे देखाव्याच्या माध्यमातून साकडे घातले होते.

सर्वच स्पर्धकांनी इको फ्रेंडली साहित्य वापरुन देखावा साकारला होता. यासाठी सर्वांचाच गौरव व्हायला हवा, मात्र स्पर्धेचे नियम असल्यामुळे आपण तीन विजेत्यांना बक्षिस जाहीर करत आहोत. विजेते पुढीलप्रमाणे आहेत.

प्रथम – अनिकेत मुळे, नाशिक : अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा
द्वितीय – उमेश पोतनीस, मुंबई : अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा
तृतीय – संजय कारंडे, कल्याण : अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा

महानगरतर्फे प्रथम पारतोषिक म्हणून रोख रुपये तीन हजार, द्वितीय पारतोषिक रुपये दोन हजार आणि तृतीय पारतोषिक रुपेय एक हजार घोषित करण्यात आले आहेत. शिवाय तीनही विजेत्यांना आपलं महानगर आणि माय महानगरकडून मानचिन्ह देण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रवासावर बंधने आहेत. त्यामुळे यावर्षी बक्षिस वितरणाचा जाहीर कार्यक्रम न ठेवता. आपलं महानगरच्या कार्यालयात विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

First Published on: September 5, 2020 8:43 PM
Exit mobile version