कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: मनोज सालियान यांच्या बाप्पाला सुरमयी सजावट!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: मनोज सालियान यांच्या बाप्पाला सुरमयी सजावट!

मनोज सालियन

मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या मनोज सालियान यांनी गणरायाची सुरमयी सजावट केली आहे. त्यांनी सरगमच्या सजावटीत वाजंत्र्यांनाही बसवले आहे. बाप्पाचे वाहक असणारे मूषक हे विविध वाद्य घेऊन बाप्पाची आराधना करत आहेत. सूर निरागस हो… गणपती…, असे त्यांनी गणरायाच्या शेजारी फलक लावले आहे. दरवर्षी मनोज यांच्या घरी ११ दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दीड दिवसाचा बाप्पा आणला होता. मनोज यांची मूर्तीदेखील इको फ्रेंडली असून त्याची उंची एक फूट आहे. सजावटीसाठी त्यांनी कागदाचा वापर केला असून यासाठी वर्तमान पत्राचा कागद वापरला आहे. त्यांनी त्यांच्या बाप्पाचे विसर्जन चेंबूर येथील तलावात केले आहे.

First Published on: August 31, 2020 5:05 PM
Exit mobile version