कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पर्यावरण-स्नेही सजावटीत बाप्पा विराजमान

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पर्यावरण-स्नेही सजावटीत बाप्पा विराजमान

विलेपार्ले येथे राहणाऱ्या आशिष पांडूरंग कदम यांनी आपल्या बाप्पांची सजावट पर्यावरण स्नेही केली असून त्यांच्या बाप्पांची मूर्ती देखील शाडूच्या मातीची आहे. कदम परिवाराकडे पाच दिवसांचा बाप्पा विराजमान असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित विषयावर कदम परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन आपल्या बाप्पाचा देखावा सादर केला असल्याचे दिसत आहे.

यंदा कोरोनाचे संकट देशभरासह राज्यावर असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे आणि देशावर ओढावलेल्या महामारीमुळे सगळेच जण घरात आहे. मात्र ही वेळ कंटाळून जाण्याची नाही तर, मिळालेल्या संधीचं सोनं करून आपल्या परिवाराला वेळ देण्याची असंही म्हणता येईल. यावरच आधारित कदम परिवाराने आपल्या बाप्पाचा देखावा साकारला आहे.

सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांची यादी खालीलप्रमाणे,

कोरोना संकटामुळे परिवारातील सदस्य घरी असल्याने एकमेकांना वेळ द्या, योगा-प्राणायम करून आपले आरोग्य उत्तम ठेवा, यासह जास्तीत जास्त कुटुंबातील सदस्यांसह आपल्या वेळ घालवून त्यांच्याशी संवाद साधा, असे या सजावटीच्या माध्यमातून आशिष कदम यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published on: August 31, 2020 4:04 PM
Exit mobile version