कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखाव्यातून दिले जनजागृतीचे संदेश

पल्लवी किरण खुटाडे यांचा १० दिवसांचा गणपती आहे. गेले ७ ते ८ वर्षांपासून खुटाडे कुटुंबिय गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहेत. पल्लवी या नाशिक मधील चेतना नगर येथील रहिवाशी आहेत. प्रत्येक वर्षी पर्यावरणपुरक डेकोरेशन केले जाते. दरम्यान संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर, आपण सर्वांनी घ्यावयाचे खबरदारीचे उपाय आणि त्यावर आधारित जनजागृतीचा संदेश डेकोरेशनच्या स्वरुपात साकारले आहे.

या बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये वैद्यकीय संबंधित वस्तूंचा वापर केला गेला आहे. तसेच बाप्पाची गोंडस मुर्ती कमळाच्या फुलात विराजमान केली आहे. बाप्पाची मुर्ती देखील घरीच साकारण्यात आली आहे. मुर्ती सुंदर हिरे बसवण्यात आले आहेत.

डेकोरेशनसाठी वापरले जाणारे साहित्य

शाडूमती, रंग, कुंदन, घोटीव कागद, गम, कोरोनाचे चित्र, न्युजपेपर, व्हाईट पेपर, स्केचपेन, मास्क, सर्जिकल ग्लोज, सलाईन बॉटल, डॉक्टर कॅप, सिरीज, चौरंग, कापड, तांब्याचा घरीच डेकोरेट केलेला कळस, नारळ, रंगीत रांगोळी, कोरोनवरील संदेश.

First Published on: August 25, 2020 12:38 AM
Exit mobile version