कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: साक्षी झंवर यांची बाप्पासाठी खास आरास!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: साक्षी झंवर यांची बाप्पासाठी खास आरास!

गणपती स्पर्धा

साक्षी झंवर यांच्या घरी ११ दिवसांचा बाप्पा विराजमान झाला आहे. पण त्यांच्या बाप्पाचे डेकोरेशन काहीसे हटके आहे. यांनी सजावट करताना बाप्पाच्या मुर्तीचे प्रतिबिंब निर्माण करण्यासाठी आरशाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे गणपतीच्या मागे सजावटीसाठी कागदी कोनांचा वापर केला आहे. यामुळे ही सजावट अधिकच खुलून आली आहे आणि ही गणपतीची मुर्ती हॉलच्या अगदी मध्यभागी विराजमान झाली आहे. त्यामुळे तीनही बाजूंनी ही आरास, आणि हे सौदर्य आपण पाहू शकतो.

त्याचप्रमाणे एलएडी लाईटचा वापर करण्यात आला आहे. यावेळी एलएडी लाईटचा वापर करून हनुमान, राधा-कृष्ण, आणि शंकरच्या प्रतिकृती तयार होतात. तर दुसऱ्याबाजूला दांडिया रास तयार करण्यात आला आहे. माचिसच्या काड्या, पेपर, काच याचा वापर करून हा दांडिया रास तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माचिसच्या काड्यांचा वापर करून रिध्दी- सिध्दी देखील तयार करण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे. त्याचबरोबर जून्या सीडी, रंगती कागदांचा वापर करून भिंत ही सजवण्यात आली आहे.

त्याचबरोबर या कोरोनाच्या काळात आपले कोरोना वॉरियर्स अर्थात डॉक्टर आणि पोलीस माणसांच्या सन्मानार्थ एक पुतळा तयार करण्यात आला आहे. यावर लोकांना सुरक्षित रहावे असा संदेशही देण्यात आला आहे.

सजावटीसाठी वापरलेलं साहित्य

बांगड्या, पेपर, माचिसच्या काड्या, वूलन थ्रेड, सीडी, चमकदार कागद

First Published on: August 28, 2020 8:13 PM
Exit mobile version