30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी बनतोय ‘हा’ दुर्लभ योग; होणार धनलाभ

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. यंदा 7 मार्च 2023 रोजी होलिका दहन केले जाईल आणि 8 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, या दोन्ही दिवशी ग्रहांची स्थिती विशेष राहिल ज्यामुळे अद्भत संयोग बनतील.

शनि-सूर्य आणि बुध बनवणार त्रिग्रही योग

या वेळी शनिच्या कुंभ राशीत शनि-सूर्य आणि बुध ग्रह युती बनवत आहेत. या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग बनत आहे. असा संयोग 30 वर्षानंतर बनत आहे. याआधी 1993 मध्ये होळीच्या दिवशी हे तीन ग्रह कुंभ राशीमध्ये होते.

कुंभ राशीमध्ये सूर्य आणि बुध बुधादित्‍य राजयोग तयार करत आहेत. ज्योतिषामध्ये बुधादित्‍य राजयोग खूप शुभ मानले जाते. हा योग यावेळी वृषभ, शुक्र आणि कुंभ राशींना शुभ फळ देईल.

याव्यतिरिक्त गुरु ग्रह स्वतःच्या मीन राशीमध्ये आहे. हा योग 12 वर्षांनी बनत आहे. याआधी 2011 मध्ये गुरु आपल्या मीन राशीमध्ये होता. या प्रकारे ग्रहांची शुभ आणि अद्भूत स्थिती दुर्लभ योग बनवत आहे. ज्याचा प्रभाव 12 राशींवर पाहायला मिळेल.


हेही वाचा :

तब्बल 70 वर्षांनंतरच्या पंचमहायोगाचा ‘या’ 4 राशींना होणार फायदा

First Published on: February 28, 2023 5:23 PM
Exit mobile version