राशीभविष्य : शुक्रवार ०३ मे २०२४

राशीभविष्य : शुक्रवार ०३ मे २०२४

राशीभविष्य

मेष – सामाजिक कार्यात योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. यश मिळेल.
वृषभ – कोर्टाच्या कामात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या व बोला. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल.
मिथुन – कठीण परिस्थितीवर कशी मात करावयाची हे शिकण्यास मिळेल. जिद्द ठेवा. प्रयत्न करा. नम्रता ठेवा. जास्त अपेक्षा ठेवू नका.
कर्क – सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.
सिंह – घरातील समस्या सोडवता येईल. शांत चित्ताने विचार करू शकाल. धंदा वाढेल. खर्च करावा लागेल.
कन्या – कामातील समस्यांमुळे मन उदास राहील. धावपळ वाढेल. गुप्त कारवायांचा त्रास होऊ शकतो. बोलताना संयम ठेवा.
तूळ – ठरविलेली कामे वेळेत पूर्ण होतील. धंद्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. महत्त्वाची भेट घेता येईल.
वृश्चिक – कुणालाही कमी समजू नका. अंदाज मागे-पुढे होऊ शकतो. वेळेला व कामाला महत्त्व दिल्यास यश मिळेल.
धनु – अपेक्षित व्यक्तींची भेट घेता येईल. मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. वरिष्ठांना मानाने वागवा.
मकर – सामाजिक कार्यात आत्मविश्वास वाढेल. डावपेच यशस्वी होऊ शकतात. वेळ फुकट घालवू नका.
कुंभ – मनाची चंचलता होईल. विलंबाने काम पूर्ण होईल. धंद्यात वाढ होईल. नवीन विषयाचा अभ्यास करून मग बोला.
मीन – उत्साहाच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नका. गुप्त शत्रूला कमी लेखू नका. थोरा-मोठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

First Published on: May 3, 2024 1:12 AM
Exit mobile version