मेष ः- कोणत्याही समस्येवर उपाय शोधता येईल. आनंदी रहाल. धंद्यात काम मिळेल.
वृषभ ः- सावधपणे काम करा. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. प्रवासात घाई करू नका. प्रेमाने वागा.
मिथुन ः- ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क ः- आवडीचे पदार्थ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात नव्या कामाचा शोध घेऊ शकाल.
सिंह ः- मन उत्साहित होईल. समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
कन्या ः- पाहुण्यांचे स्वागत आदराने कराल. मोठी खरेदी करताना घाई करू नका. नवा विचार मिळेल.
तूळ ः- उत्साह व आनंद वाढेल. नव्या कार्याला दिशा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.
वृश्चिक ः- कोणताही वाद वाढू देऊ नका. प्रेमानेच तुमचे मत दुसर्याला पटवून द्या. वाहनाचा वेग कमी ठेवा.
धनु ः- आनंदी रहाल. मुलांचा सहवास मिळाल्याने समाधान मिळेल. स्पर्धेत चमकाल. नवीन ओळख होईल.
मकर ः- विचारांना चालना मिळेल. ठरविलेले काम करता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. मैत्री वाढेल.
कुंभ ः- तुमच्या क्षेत्रात कशी प्रगती करता येईल याचा विचार कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.
मीन ः- धंद्यात टिकून राहता येईल. खर्च वाढेल. तुम्हाला पदाधिकार मिळण्याची शक्यता आहे.