राशीभविष्य : मंगळवार ०९ एप्रिल २०२४

राशीभविष्य : मंगळवार ०९ एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणींवर मात करता येईल. अचानक एखादी चांगली घटना मनावरील ताण दूर करेल. धंदा वाढेल.

वृषभ – व्यवसायात नवा पर्याय शोधता येईल. समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. नवीन परिचयातून नवा विचार तुम्हाला मिळेल.

मिथुन – सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसूल करा.

कर्क – जीवनसाथीच्या सहकार्याने अडचणी कमी होतील. दगदग वाढेल. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. नवीन परिचय होईल.

सिंह – मन उदास राहील. उशीर झाला तरी तुमचे काम होण्यास वरिष्ठांची मदत मिळेल. रागावर ताबा ठेवा. शांत राहा.

कन्या – एखादी चर्चा वादाकडे झुकण्याची शक्यता आहे. घरातून सहाय्य मिळेल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात मतभेद होतील.

तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. सामाजिक कार्याने आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान योग येईल. स्पर्धा जिंकता येईल.

वृश्चिक – गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल. प्रवासात काळजी घ्या. धंद्यात तुमचा अंदाज बरोबर येईल.

धनु – ठरविलेल्या कामात यश मिळेल. भेटीत यश मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. दर्जेदार परिचय होईल. व्यवसायासाठी महत्त्वाचा निर्णय घेता येईल.

मकर – रेंगाळलेली कामे पूर्ण करू शकाल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यातील त्रुटी कमी करता येतील. जनसंपर्क वाढेल.

कुंभ – घरात क्षुल्लक वाद होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या. फार गर्दीत जाण्याने त्रास होईल. वरिष्ठांना कामात मदत कराल.

मीन – संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. थोरा-मोठ्यांबरोबर नम्रतेने वागा. कायद्याचे पालन करा. महत्त्वाची वस्तू जागेवर ठेवा.

First Published on: April 9, 2024 1:01 AM
Exit mobile version