मेष : तुमचा उत्साह वाढेल अशी घटना घडेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. दादागिरी करू नका.
वृषभ : घरात समस्या येईल. मौल्यवान वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. वाटाघाटीत वादविवाद होईल.
मिथुन : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्टाच्या कामात योग्य मुद्दा काढून ठेवा व मगच बोला. मित्र मदत करतील.
कर्क : नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने तुमच्या बाजूने निकाल लागेल. राजकारणात प्रतिष्ठा मिळेल. लोकांना कमी लेखू नका.
सिंह : राजकीय-सामाजिक प्रश्नावर काम कराल. लोकप्रियता मिळेल. वरिष्ठांचा तुमच्यावर दबाव राहील. धंदा मिळेल.
कन्या : किरकोळ कारणाने घरातील वातावरण ताणलेले राहील. डोळ्यांची काळजी घ्या. शेजारी मदत मागण्यास येईल.
तूळ : जीवनसाथीला खूश कराल. जीवनातील कमी भरून काढण्याचा प्रयत्न करा. नोकरी लागेल. अधिकार मिळेल.
वृश्चिक : कामाचा व्याप वाढेल. नवे मित्र मिळतील. आळस करू नका. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. धंदा मिळेल.
धनु : नम्रता ठेवल्यास सरकार दरबारची कामे करून घेता येतील. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावता येईल.
मकर : चिकाटी ठेवल्यास नवे काम मिळेल. जवळचे लोक तुम्हाला सल्ला देतील. वस्तू खरेदी करताना पाकीट सांभाळा.
कुंभ : विषयाला चालना देणारी घटना घडेल. घर खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा स्पर्धा जिंकाल.
मीन : धंद्यात मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. अधिकार प्राप्ती मिळेल. नोकरीत फायदा होईल.