राशीभविष्य : मंगळवार ३० एप्रिल २०२४

राशीभविष्य : मंगळवार ३० एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष – दूरदृष्टिकोन उपयोगी पडेल. दुसर्‍यांच्या डावपेचांचा अंदाज येईल. भावनेत अडकू नका. धंद्यात वाढ होईल.

वृषभ – विरोध पत्करून कामात मग्न व्हावे लागेल. जिद्द सोडू नका. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन – प्रकृती अस्थिर राहील. बाहेरचे खाणे टाळा. दुसर्‍यांच्या बोलण्याचा विचार कराल. कामात सहकारी मदत करतील.

कर्क – जीवनसाथीच्या मदतीमुळे अवघड कामात यश मिळवता येईल. प्रवासात नवीन परिचय होईल. दिवस चांगला जाईल.

सिंह – वागण्या-बोलण्यात अहंकार ठेवल्यास वाद होतील. संबंध सुधारण्या ऐवजी बिघडतील. अहंकार बाळगू नका.

कन्या – मुलांच्या भवितव्याविषयी विचार कराल. खर्च होईल. कौटुंबिक वाटाघाटीत वर्चस्व राहील. धंद्यात वाढ होईल.

तूळ – सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल.

वृश्चिक – शत्रूचे डावपेच लक्षात येतील. परंतु ते उघड करू नका. त्यातच तुमचे यश दडलेले असेल. धंद्यात लक्ष द्यावे.

धनु – फायदेशीर योजना समोर येईल. कामासाठी भटकंती होईल, परंतु आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात जाईल.

मकर – उद्योगी स्वभावाचा फायदा होईल. चांगल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात, शेअर्समध्ये लाभ होईल.

कुंभ – घर, वाहन खरेदीचा निर्णय घेताना घाई करू नका. चूक होण्याची शक्यता आहे. प्रवासात महत्त्वाची वस्तू सांभाळा.

मीन – तडजोडीमुळे नुकसान टळेल. तुमच्या कामाचा सुगावा इतरांना लागू देऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

First Published on: April 30, 2024 1:09 AM
Exit mobile version