मेष :- लोकसंग्रह वाढवता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.
वृषभ :- स्वतःच्या कामात तत्परता दाखवा. तुमचे वर्चस्व वाढेल. धंद्यात फायदा होईल. घरात वाद करू नका.
मिथुन :- महत्वाच्या कामात यश येईल. नातलग भेटतील. नोकरीत कामाचा व्याप सहन करूनही तुम्ही खूश रहाल.
कर्क :- अनाठाई खर्च होईल. घरात नाराजी जाणवेल. सामाजिक कार्यात हिशोब नीट करा.
सिंह :- घरातील वातावरण बदलेल. तुमच्या हिताचा विचार सर्व जण करतील. अरेरावी करू नका.
कन्या :- तुमच्या स्वभावावर टीका होऊ शकते. आत्मियता तुम्हाला मिळणे कठीण आहे. चिडचिड होईल.
तूळ :- दिशाहीन विचार दूर सारून योग्य मार्गाने पुढे जाता येईल. धंद्यात फायदा होईल. कष्ट घ्या.
वृश्चिक :- किरकोळ वाद वाढवू नका. मान-पानाचा विचार न करता काम करावे लागेल. धंदा मिळवा.
धनु :- चांगल्या विचारांच्या माणसांची ओळख होईल. नातलग भेटतील. स्पर्धेत यश मिळेल.
मकर :- तुमच्या कामाला वेग प्राप्त होईल. योग्य करार करता येईल. मोठे लोक मदत करतील.
कुंभ :- विचारांची दिशा बदलून बोलावे लागेल. धंद्यात पुढे झालं. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
मीन :- काम करताना वेळ जास्त खर्च होईल. वाद होईल. तुमचा खर्च वाढू शकतो. वाहन जपून चालवा.