राशीभविष्य : बुधवार १० एप्रिल २०२४

राशीभविष्य : बुधवार १० एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष- मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या योग्य डावपेचाचे परिणाम दिसतील. दर्जेदार नवीन परिचय होतील. आनंद मिळेल.

वृषभ- प्रकृती अस्थिर राहील. मन चंचल होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन परिचयाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करता येईल ते पाहा.

मिथुन:- घरात आनंदी वातावरण ठेवता येईल. मनावरील दडपण कमी होईल. जीवनसाथीच्या उत्कर्षाची बातमी कळेल. प्रेमाला चालना मिळेल.

कर्क – जास्त अपेक्षा ठेवू नका. मन उदास राहील कामाचा व्याप वाढेल. धंद्यात लक्ष द्या. नम्रतेने वागा व बोला. शांत राहा.

सिंह – मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. मोठी खरेदी होईल. मौजमजेत वेळ जाईल. नवीन व्यक्तीचा परिचय होईल.

कन्या – दुसर्‍याच्या विचारांचा आदर करा म्हणजे संघर्ष टळेल. खाण्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.

तुला – ठरविलेल्या कार्यक्रमात उत्साहाने कामे होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात नवे काम मिळेल.

वृश्चिक- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. मागील थकबाकी वसूल करा. पाहुणे येतील. कला क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.

धनु – अपेक्षित कामे पूर्ण होतील. दर्जेदार व्यक्तीचा परिचय होईल. आत्मविश्वासाने कठीण काम पूर्ण करता येईल.

मकर – मन अस्थिर होईल. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. दुसर्‍याचे विचार ऐकून घ्या म्हणजे नवे काही शिकण्यास मिळेल.

कुंभ – उत्साह वाढेल. खरेदी कराल. पाहुणे येतील. कार्यक्रम ठरविल्याप्रमाणे पार पडेल. समाधान मिळेल. यशस्वी दिवस राहील.

मीन – प्रयत्नाने यश खेचून आणा. धंद्यातील नुकसान टाळता येईल. प्रसंगावधान महत्त्वाचे ठरेल. सामाजिक कार्यात यश मिळेल.

First Published on: April 10, 2024 1:52 AM
Exit mobile version