राशीभविष्य : मंगळवार २३ एप्रिल २०२४

राशीभविष्य : मंगळवार २३ एप्रिल २०२४

मेष – सामाजिक कार्यात मित्र-सहकारी मदत करतील. कामात वरिष्ठांकडून कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ – मरगळ दूर झाल्याने कामाचा उत्साह वाढेल. भेटी-गाठीत यश मिळेल. लाभदायक योजना पुढ्यात येतील.
मिथुन – मनाची द्विधा अवस्था झाल्याने समोरची व्यक्ती संभ्रमात पडेल. प्रेम प्रकरणात सावधपणे निर्णय घ्या.
कर्क – शेअर्सच्या गुंतवणुकीचा अंदाज चुकेल. मनस्ताप होईल. तुमचे डावपेच उघड होण्याची शक्यता आहे.
सिंह – अरोपाला उत्तम उत्तर देता येईल. सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. घरगुती वाटाघाटीत लाभ होईल.
कन्या – व्यक्तीगत प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. आत्मविश्वासाने समाजकार्यात भाग घ्याल.
तूळ – मुलांच्या सहवासाने उत्साहित व्हाल. प्रवास होईल. गंभीर प्रश्नावर चर्चा कराल. यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृश्चिक – खाण्या-पिण्यात बेफिकीरी केल्यास त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन वेग कमीच ठेवा. घाई गडबड करू नका.
धनु – संसारातील अडचणी कमी करता येतील. कामासाठी नोकर मिळेल. कोर्टकेसमध्ये सरशी होईल. संधी मिळेल.
मकर – माणसाची प्रामाणिकता ओळखणे कठीण असते. प्रसंगावरून त्याचा स्वभाव तुमच्या लक्षात येईल. खर्च वाढेल.
कुंभ – मुलांच्या प्रगतीकडे लक्ष जाईल. प्रवासात आनंद मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थी प्रगती करतील.
मीन – तडजोड केल्यास फायदा होईल. घरगुती उपकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्थिर वाटेल.

First Published on: April 23, 2024 3:00 AM
Exit mobile version