राशीभविष्य : सोमवार २९ एप्रिल २०२४

राशीभविष्य : सोमवार २९ एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष – आजचे डावपेच फारच महत्त्वपूर्ण ठरतील. भेटी-गाठीत यश मिळेल. महत्त्वाची चर्चा सफल होईल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ – प्रकृतीवर ताण पडेल. अचानक विचारात बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. कोर्ट केस जिंकाल.

मिथुन – जीवनसाथीच्या समजूतदार वागणुकीमुळे मनाला उभारी येईल. प्रसन्न दिवस वाटेल. सामाजिक कार्यात यश मिळेल.

कर्क – वादविवाद व तणाव निर्माण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. शंका निर्माण होणारे वर्तन टाळावे लागेल.

सिंह – मनावरील ताण दूर होईल. संकटात मित्र-परिवार मदतीला धावून येतील. दिवसात शुभ समाचार मिळेल.

कन्या – आप्तेष्ट-मित्र यांच्यात गैरसमज वाढेल. शांततेतून मार्ग काढा. खाण्यापिण्याचे यंत्र बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ – आत्मविश्वास व उत्साह वाढण्यास मदत होईल. नवीन विचाराने प्रेरित व्हाल. नवीन कल्पना सुचेल. यश मिळेल.

वृश्चिक – व्यवसायात अचूक निर्णय घेता येईल. जीवनाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. धंदा वाढेल.

धनु – योग्य विचाराने अडचणींवर मात करता येईल. कला-साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

मकर – फाजील आत्मविश्वास ठेवू नका. बोलताना मागचा-पूढचा विचार जरूर करा. घरातील खर्च वाढेल.

कुंभ – दिवसभरात तुम्ही सुरू केलेल्या कार्याला चालना मिळेल. त्यासाठी वरिष्ठ मदत करतील. दिवस आनंदात जाईल.

मीन – संयमाने प्रश्न सोडवा. खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा करू नका. घरात आशादायक वातावरण राहील.

First Published on: April 29, 2024 2:00 AM
Exit mobile version