दीड वर्ष राहू-केतुच्या संक्रमणाचा ‘या’ 3 राशींवर पडणार अशुभ परिणाम

दीड वर्ष राहू-केतुच्या संक्रमणाचा ‘या’ 3 राशींवर पडणार अशुभ परिणाम

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाचे महत्त्व आहे. नवग्रहातील राहू-केतु या दोन्ही ग्रहांना पापी ग्रह मानलं जातं. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांसोबत मिळून 12 राशींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम दाखवतात. राहू-केतु नेहमी वक्री चाल चालतात आणि दीड वर्ष एकाच राशीत राहतात. 30 ऑक्टोबरला हे दोन्ही ग्रह आपली स्थिती बदलतील. या दरम्यान, राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील.

ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या राहु मेष राशीत असून केतु तूळ राशीत आहे. 30 ऑक्टोबरला हे दोन्ही ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतील. या वेळी राहु मीन राशीत प्रवेश करणार असून केतु कन्या राशीत प्रवेश करेल. या दोघांच्या या संक्रमणादरम्यान अनेक राशींना शुभ तर काहींना अशुभ परिणाम मिळतील.

राहू-केतुच्या संक्रमणाचा ‘या’ 3 राशींवर होणार परिणाम

राहू-केतुच्या संक्रमणाचा मेष राशीच्या व्यक्तींवर अशुभ परिणाम पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे टाळा. या काळात मेष राशीच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती निर्माण होईल. अशुभ प्रभाव रोखण्यासाठी भगवान शिवाची आराधना करा.

राहू-केतुच्या संक्रमणाचा वृषभ राशीवर देखील अशुभ परिणाम पाहायला मिळेल. या काळात व्यक्तीला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. पती-पत्नीमधील वादाच्या बाबतीत वैवाहिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. कुटुंबात अशांततेचे वातावरण राहील.

राहु-केतुच्या अशुभ ग्रहांचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी संघर्ष वाढवेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ शकते. राहू-केतूच्या हालचालीमुळे तुमचा स्वभाव क्रोधित होईल. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा.


हेही वाचा :

चुका करण्यात ‘या’ राशीचे व्यक्ती असतात खूप पटाईत

First Published on: May 24, 2023 12:16 PM
Exit mobile version