राशी भविष्य १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर

मेष :- कन्या राशीत सूर्य बुध प्रवेश करीत आहे. रविवार तुमची धावपळ जास्त वाढेल. थकवा वाटू शकतो. गौरी पूजन शांतचिंताने करा. त्यानंतर दिवस तुम्हाला उत्साह देणारा ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात जनतेचा कौल बघून योजना बनवा. सर्वांच्या विचारांचा आदर करा. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांना विरोध करू नका. घरातील व्यक्तीचा आधार वाटेल. धंद्यात गोड बोलून काम करू नका. मोठेपणाचा आव कुठेही आणू नका. सौम्य प्रेमाने बोला. कला-क्रिडा क्षेत्रात नविन ओळख होईल. स्पर्धा कठीण वाटेल. पण कौतुक होईल. कोर्टकेस मध्ये संधी पाडून योग्य ते बोला. संशोधन कार्यात कदाचित अचानक बदल संभवतो. विद्यार्थी वर्गाने शिक्षक व वरिष्ठांना दुखवु नये. शुभ दि. १७, २०

वृषभ :- वृषभेच्या पंचमात सूर्य, बुध, प्र्रवेश करीत आहे. रविवार महत्वाचे कामे होईल. गौरी पूजन मनोभावे होईल. गौरी विसर्जनाच्या दिवशी घरात, बाहेर तणाव, वाद होईल. संयम ठेवा. कोणताही कायदा मोडू नका. पोलीसी त्रास होऊ शकतो. कोर्टाच्या कामात योग्य सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मदतीचा फायदा करून घेता येईल. कुठेही अतिरेक करू नका. धंदा मिळेल. वाढ करता येईल. आळस करू नका. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कला-क्रिडा क्षेत्रात जवळच्या व्यक्ती बरोबर मतभेद होतील. कोणालाही तोडून बोलू नका. जीवनसाथीची मर्जी राखा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे. संगत चांगली ठेवावी. संशोधनात गुरुवार नंतर क्लू मिळेल. शुभ दि. २०, २१

मिथुन :- कन्या राशीत सूर्य, बुध, प्रवेश करीत आहे. रविवारी स्वभावात चिडचिडेपणा येईल. गौरी पूजनात लक्ष द्या. कोणतेही विधान करतांना राजकीय-सामाजिक कार्यात काळजी घ्या. वाहन जपून चालवा, दुखापत संभवते. धंद्यात जम बसेल. गिर्‍हाईकाबरोबर चांगल्या पद्धतीने व्यवहार करा. मोठे काम मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात बुद्धिचातुर्य व चपळता दिसून येईल. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. विद्यार्थी वर्गाने परिक्षेवर नजर ठेऊन नीट अभ्यास केला पाहिजे. संशोधन कार्यात यश मिळेल. नातलगांच्या भेटीने उत्साह वाढेल. मुलांच्या कामात प्रगति होईल. शुभ दि. 17,१८

कर्क :- कर्कराशीच्या तृतीया स्थानात सूर्य बुध प्रवेश करीत आहे. घरात शुभ समाचार मिळेल. विसर्जन्या दिवशी शांतपणे कामे करा. बोलतांना चूक करू नका. कायदा सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना योग्य प्रतिसाद मिळेल. लोकांचे प्रेम मिळवता येईल अशी कामे करा. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. धंद्यात चांगला चांगल जम बसेल. मोठ्या लोकांच्या ओखळीतून काम मिळू शकते. विद्यार्थी वर्गाला परिक्षेत पुढे जाता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. कोर्टकेस मध्ये प्रगति होईल. शुभ दि. 20,21

सिंह :- रविवार किरकोळ कारणावरून समस्या वाढू शकते. संयम ठेवा. नंतरचे दिवस तुम्हाला यश देणारे आहेत. कन्या राशीत सूर्य बुध प्रवेश करीत आहे. गौरी पूजनात एकाग्रता ठेवा. इतर विचार दूर ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व दिसेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मोठे कंत्राट मिळवा. थकबाकी वसूल करा. जमिनीच्या व्यवसायात यश मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने वेळच्या वेळी अभ्यास पूर्ण करावा. संशोधन कार्यात यश मिळेल. कोर्टकेसमध्ये शुक्रवारी तणाव वाढू शकतो. शुभ दि. 17.18

कन्या :- तुमच्याच राशीत सूर्य, बुध, प्रवेश करीत आहे. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. विरोधकांना राजीकय-सामाजिक कार्यात गप्प करता येतील. तुमचे मुद्दे पटवून देता येतील. गौरी पूजन मनोभावे होईल. देवीच्या आशिर्वादाने एखादे अडलेले काम पूर्ण शकाल. संसारात महत्वाची घटना घडेल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. परिक्षेसाठी चांगले मार्गदर्शन घेता येईल. कला-क्रिडा क्षेत्रातील समस्या कमी होईल. नविन ओळख वाढेल. कोर्टकेस मिटवता येईल. रविवार तुमच्या उत्साहाचा राहिल. घर, वाहन, दुकान इ. खरेदी होऊ शकेल. संशोधन कार्याला योग्य दिशा मिळेल. तुमच्या बुद्धिचे कौतुक होईल. दूरच्या प्रवासच्या बेत ठरवाल. नोकरी बदलता येईल. सल्यासाठी तुम्ही भेटू शकाल. शुभ दि. 20,21

तुला :- कन्या राशीत प्रवेश करणारा सूर्य, बुध तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. गौरीपूजन यथासांग पूर्ण होईल. कामाचा व्याप घरात वाढेल. आप्तेष्ठांच्या मदतीला जावे लागेल. त्यांची नाराजी तुमच्या मागे गैरसमज करून देण्याचा प्रयत्न होईल. रागावर काबू ठेवा. तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणींनी तुम्ही गोंधळून जाल. स्पष्ट बोलणे उपयुक्त ठरणार नाही. वेळ प्रसंग पाहूनच वरिष्ठांच्या कडे बोला. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. तुमचा मोठेपणा इतरांना डोळ्यात खुपेल. कला-क्रिडा क्षेत्रात चिंता वाटेल. कोर्टकेस मध्ये कमीच बोला.संशोधन कार्यात कुणाला दुखवु नका. शुभ दि. १६, १८

वृश्चिक :- कन्या राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. रविवार तुमचा उत्साहाचा ठरेल. गौरीपूजन होईल. नविन परिचय फायदेशिर ठरेल. असे वाटत असले तरी संयम ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय या सप्ताहात घेता येईल. लोकांना नाराज करू नका. धंद्यात आळस करून चालणार नाही. प्रेमात किरकोळ गैरसमज होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने कुठेही वेळ, पैसा अनाठाई खर्च करू नये. कला-क्रिडा क्षेत्राला पुढे जाणे महत्वाचे ठरेल. कोर्ट केस मध्ये मार्ग शोधता येईल. संशोधन कामात बुद्धिनेच काम होईल. थट्टा-मस्करी करतांना भान ठेवा. शुभ दि. 17,20

धनु :- कन्या राशीत सूर्य, बुधाचे राश्यान्तर होत आहे. साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. रविवारी थोड्या अडचणी वाटतील. वाहन जपून चालवा. श्रीगौरीचे पूजन शांत चित्ताने करा. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट घेण्याचा प्रयत्न करा. भिडस्तपणा ठेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा तणाव वाढेल. लोकांचे प्रेम मिळवा. लोकसंग्रह मोठे करा. कला-क्रिडा क्षेत्रात नावलौकीकात भर पडेल. पुरस्कार व लाभ मिळेल. विद्यार्थी वर्गाला भरघोस यश मिळेल. प्रयत्न हे नेहमीच करावयाचे असतात. आता ग्रहांची साथ चांगली आहे. कोर्टकेस संपवा. पुढील वर्षात अडचणी वाढतील. संशोधनात प्रगति होईल. काम पूर्ण होईल. शुभ दि. 19,20

मकर :- साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. कन्या राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. रविवार तुम्ही ठरविलेले व्यवस्थित पूर्ण करता येईल. श्रीगौरी विसर्जनाच्या दिवशी सावधपणे कृति करा. वादविवादाला वाढवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात कोणताही निर्णय उताविळपणे घेऊ नका. थोडा धीर धरा. नाहीतर अडचणी वाढतील. सप्ताहाच्या शेवटी समस्येवर उपाय शोधता येईल. धंद्यात व्यवहारात काळजीपूर्वक रहा. कोणतेही वक्तव्य विचारपूर्वक करा. कला-क्रिडा क्षेत्रात ध्येयावर लक्ष ठेवा. कोर्टकेसमध्ये पुढची तारीख घेणे ठीक राहिलं. विद्यार्थी वर्गाने वडिलधार्‍या व्यक्तींशी नम्रपणे बोलावे व वागावे. संशोधनाच्या कामात नवे सूत्र हाती लागेल. शुभ दि. 21, 22

कुंभ :- कन्या राशीत सूर्य, बुध, प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्वाची कामे करून घ्या. गौरीपूजन, विसर्जन व्यवस्थित होईल. जास्त धाडस कुठेही करू नका. दुखापत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही कडक प्रतिक्रिया दिल्यास हल्लाबोल होईल. तुमचा राग सप्ताहाच्या मध्यावर अनावर होईल. धंद्यात अडचणी वाढतील. गुप्त कारवाया करणारे लोक वाढतील. कला-क्रिडा क्षेत्रात कठीण परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाने हाणमारीत पडू नये. वाहन जपून चालवावे. कोर्टाच्या कामात समस्या वाढू शकते. संशोधन कार्यात चूका होण्याचा संभव आहे.
शुभ दि. १६, २२

मीन :- मीनेच्या सप्तमस्थानात सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या कार्याला वेग येण्यास सुरुवात होईल. रविवारी गौरीपूजन चांगल्या मनाने करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात संयमाने वागा. अरेरावी करू नका. तुमची प्रतिष्ठा सांभाळा. धंद्याला कलाटणी देणारी घटना घडेल. शेअर्सचा अंदाज घेतांना. सावधपणे घ्या. मोह आवरा. कला-क्रिडा क्षेत्रात बॉर्डरवर राहाल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. कोर्टकेस मध्ये दिलासा मिळेल. संशोधन कार्यात संभ्रम अवस्था राहिल. यशाच्या जवळपास जाता येईल. मैत्रीत वाहवत जाऊ नका. शुभ दि. १९, २०

First Published on: September 16, 2018 2:19 AM
Exit mobile version