अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण; सचिन तेंडुलकरांची भावनिक पोस्ट

अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण; सचिन तेंडुलकरांची भावनिक पोस्ट

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यांनी अखेर आयपीएलचा पहिला सामना खेळला आहे. तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २३ वर्षाच्या अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध केकेआरच्या सामनातून रविवारी (१६ एप्रिल) मैदानात उतरला होता. या सामन्याने अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यावेळी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) इस्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटरवर अर्जुनसाठी भावनिक पोस्ट लिहिली.

सचिन तेंडुलकरने पोस्टमध्ये लिहिले की, “आज क्रिकेट विश्वात पदार्पण करून तू तुझ्या आयुष्यातील एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. मी वडील या नात्याने तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. मी क्रिकेटचा खूप मोठा चाहता देखील आहे. मला माहिती आहे की, तू क्रिकेटचा मनापासून सन्मान करतो आणि करत राहशीलच. त्याबद्दल्यात लोकांकडून ही तुला भरभरून प्रेम मिळेल. तू इथे येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस. या पुढेही तू अशीच मेहनत घेत राहणार आहे. ही तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची खरी सुरुवात आहे. ऑल द बेस्ट”

अर्जुल तेंडुलकरला त्याच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह टीममधील इतर खेळाडूंनी देखील त्यांचे अभिनंदन केले. यावेळी केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी अर्जुन तेंडुलकरला पहिल्या सामनामध्ये बॉलिंग देऊन ओपनिंग केली. यावेळी अर्जुन तेंडुलकरने २ ओव्हरमध्ये १७ रन दिले. अर्जुन तेंडुलकरचा पहिला सामना पाहण्यासाठी बहीण सारा तेंडुलकरने मैदानात हजेरी लावली होती.

यापूर्वी अर्जुन तेंडुलकरने गोव्यात १२ डिसेंबर २०२२ मध्ये आंध्र प्रदेशच्या सामन्यातून किक्रेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर अर्जुन तेंडुलकरने १३ डिसेंबर २०२२ मध्ये गोवा विरुद्ध राजस्थानच्या सामन्यातून फर्स्ट क्लास सामन्यातून डेब्यू केला होता.

First Published on: April 17, 2023 12:29 PM
Exit mobile version