परदेशात धोकादायक म्हणून बंदी घातलेल्या ‘या’ १० वस्तूंची भारतीय बाजरपेठेत खुलेआम विक्री सुरु

परदेशात धोकादायक म्हणून बंदी घातलेल्या ‘या’ १० वस्तूंची भारतीय बाजरपेठेत खुलेआम विक्री सुरु

परदेशात धोकादायक म्हणून बंदी घातलेल्या 'या' १० वस्तूंची भारतीय बाजरपेठेत खुलेआम विक्री सुरु

जगभरातील अनेक देशांनी बंदी घातलेली बरीचशी उत्पादने भारतीय बाजारपेठेत आजही खुलेआम विकली जात आहेत. या उत्पादनांपैकी बऱ्याचश्या उत्पादनांचा भारतीयांच्या दैनंदिन जीवनात वापर होत आहे. यामुळे भारतीयांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिमाण दिसून येत आहेत. जाणून घेऊ या.. परदेशात बंदी घातलेली अशी कोणती उत्पादने आहेत? जी भारतीय बाजारपेठांमध्ये सर्रास विकली जात आहेत.

डिस्प्रिन

डोकेदुखीपासून आराम मिळवा यासाठी बहुतांश भारतीय लोक डिस्प्रिनसारख्या गोळीचा वापर करतात. या गोळ्या बाजारातही सहज उपलब्ध होत आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये या गोळ्यांची चाचणी अयशस्वी ठरल्याने अमेरिकेने या औषधावर बंदी घातली. २००२ साली अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १६ वर्षाखालील मुलांसाठी या औषधाचा वापर करणे कायदेशीर गुन्हा म्हणून जाहीर केले.

जेली स्वीट्स

अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये जेली स्वीट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जेली स्वीट्स मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जात आहे. यामुळे लहान मुले गुदमरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु तरीही भारतीय बाजारपेठेत जेली स्वीट्स लहान मुलांना सहज उपलब्ध होत आहेत.

किंडर जॉय

भारतात लहान मुले आवडीने खात असलेले किंडर जॉय आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे मानत त्याच्या विक्रीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने किंडर जॉयची विक्री ‘द फूड, ड्रग अँड कॉस्मेटिक लॉ १९३८’ अंतर्गत यावर बंदी घातली आहे. जर एखादा विक्रेता याची विक्री करताना आढळ्यास त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करत अडीच लाखांहून अधिकचा दंड ठोठावला जात आहे.

डी कोल्ड टोटल

सर्दीवर औषध म्हणून वापरली जाणारी डी कोल्ड टोटल या गोळीवरही अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या औषधाच्या सेवनामुळे व्यक्तीच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा अनेक देशांचे आरोग्य अधिकारी केला आहे. परंतु भारतात या औषधांची जाहिरात आणि विक्री खुलेआम सुरु आहे.

लाइफबॉय साबण

अमेरिकेत लाइफबॉय साबणाच्या वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे, हा साबण आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम करत आहे. तसेच काही लोक या साबणाचा वापर कुत्र्यांना आंघोळ करण्यासाठी करतात. परंतु भारतात अंघोळीसाठी हा साबण सर्वाधिक लोकप्रिय आहे.

पाश्चराइज्ड न केलेले दूध

अमेरिका आणि कॅनडामध्ये पाश्चराइज्ड न केलेल्या दूधावर पूर्णपणे बंदी आहे. यावर आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पाश्चराइज्ड न केलेल्या दुधामध्ये अनेक सूक्ष्मजीव आणि रोगजंतू असतात. अशा दुथाच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र हे दूध भारतात खरेदीसाठी सर्रास उपलब्ध असते.

पेस्टीसाइट्स (कीटकनाशके)

अनेक औषधांप्रमाणे विदेशात कीटकनाशके विक्रीवरही बंदी आहे. डीडीटी आणि एंडोसल्फान सारख्या ६० हून अधिक हानिकारक कीटकनाशांवर परदेशात बंदी आहे. ही कीटकनाशके फळ आणि भाज्यांद्वारे आपल्या शरीरात जाणून घेऊन जीवघेणे आजार पसरवत आहेत, असा दावा करत बऱ्याच देशांनी याच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र भारतात कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी या कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

निमेसुलाइड

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी पेन किलर ‘निमेसुलाइड’ या औषधावर बंदी घातली आहे. यकृतासाठी अत्यंत हानीकारक असल्याने या औषधावर अनेक देशांनी अधिकृतरित्या बंदी आणली. फिनलँड आणि स्पेनने २००२ मध्ये या औषधावर बंदी घातली तर आयर्लंड आणि सिंगापूर देशांमध्ये २००७ मध्ये बाजारातून हे औषध हटवण्यात आले. मात्र अद्यापही भारतीय बाजारापेठांमध्ये हे औषध सर्रास विकले जात आहे.

ऑल्टो 800

भारतातील रस्त्यांवर धावणारी ऑल्टो 800 कार बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नातील गाडी आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, ‘ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट’ क्लीअर न केल्याने अनेक देशांत ऑल्टो आणि नॅनो सारख्या गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.


 

First Published on: July 14, 2021 12:57 PM
Exit mobile version