उत्तम आरोग्यासाठी १० घरगुती उपाय

उत्तम आरोग्यासाठी १० घरगुती उपाय

उत्तम आरोग्यासाठी १० घरगुती उपाय

प्रत्येकाला वाटते आपले आरोग्य नेहमी उत्तम राहावे. कोणताही आजार होऊ नये. मात्र, असे राहण्याकरता आपल्याला देखील आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. परंतु, आरोग्य उत्तम राहण्यासाठी नेमके काय करावे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळी उठल्यावर ४ ते ५ तुळशीची पाने स्वच्छ धुऊन त्याचे सेवन करा.

रोज दोन पाकळ्या लसूण खा, रक्तदाबाचा त्रास होणार नाही.

आवळे आणि मध एकत्र करुन खाल्यास गॅस आणि आमलप्तिाचा त्रास होणार नाही.

दालचिनीची चिमूटभर पावडर रक्तदाबाचा त्रास कमी करते.

बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून घ्यावे. यामुळे गॅसचा त्रास होत नाही.

जीरे भिजवून ते पाणी प्यायल्यास आमल्पित कमी होते आणि पोटात थंडावा येतो.

धण्याचे पाणी अधिक मूत्रासाठी उपयोगी आहे.

काळे मिरे आणि तूप एकत्र करून खाजेवर लावावे लवकर आराम मिळतो.

हळद ही अति गुणकारी आहे. रोज दोन चिमूट पाण्याबरोबर घ्यावी. हळद लोह्तात्व वाढवते. कोलेस्टेरॉल कमी ठेवते. जंतुनाशक आहे, सूज कमी करते.

मुळाचे सेवन पचनासाठी जरूर करावे, याचा फायदा होतो.

First Published on: August 7, 2020 6:00 AM
Exit mobile version