ऑफिसमध्ये रोमान्स, २७ टक्के कर्मचाऱ्यांना बॉसबरोबरच जायचंय डेटवर!

ऑफिसमध्ये रोमान्स, २७ टक्के कर्मचाऱ्यांना बॉसबरोबरच जायचंय डेटवर!

एकीकडे, जगभरातील  महिलांच्या सुरक्षेसाठी #MeToo सारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. तर दुसरीकडे एक गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकीत करू शकते ती म्हणजे, ऑफिसमध्ये होणारे Extra marital affair किंवा ऑफिसमध्ये होणारा रोमान्स.  अमेरिकेमध्ये सोसायटी फॉर ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेन्ट (एसएचआरएम) यांनी केलेल्या सर्वेनुसार २७ टक्के लोकांनी ऑफिसमध्ये रोमान्स करत असल्याची कबुली दिली आहे.

या एसएचआरएम अहवालानुसार, २७ लोकांना ऑफिसमध्ये होणारा रोमान्स महत्त्वाचा वाटतोय. तर त्यातील  २० टक्के लोक म्हणतात, की त्यांनी फक्त त्यांच्या हाताखाली काम केलेल्यांबरोबरच रोमान्स केला आहे.

या अहवालात आणखी एक विशेष गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ऑफिसमध्ये रोमांस करणार्‍या प्रत्येक चौथ्या व्यक्तीने आपल्या बॉसला डेट केलं आहे. केवळ ५२ टक्के लोकांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना डेट करण्याचा विचार कधी केला नाहीये. शिकागो विद्यापीठाच्या अमेरिकेस्पेक पॅनेलच्या सहकार्याने हे संशोधन शेम यांनी केले आहे. या संशोधनात एकूण ६९६ अमेरिकन कर्मचाऱ्यांना या सर्वेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं.

First Published on: July 27, 2020 9:13 PM
Exit mobile version