31 st सेलिब्रेशन पार्टीसाठी असा करा न्यूड मेकअप

मेकअपचे ट्रेंडस सतत बदलत असतात. पण या सगळ्यात न्यूड मेकअप हा असा मेकअप आहे जो कधीही जुना होत नाही. उलट सध्या ट्रेंडमध्ये भडक मेकअप नाही तर न्यूड मेकअपची क्रेझ आहे. 31 st पार्टी असो किंवा लग्न सभारंभ नाहीतर गेट टु गेदर न्यूड मेकअप सगळ्याच इवेंटसाठी बेस्ट मेकअप आहे. विशेष म्हणजे कमीत कमी कॉस्मेटीक वापरून ७ स्टेप्समध्ये हा मेकअप करता येतो. त्यासाठी या मेकअपमध्ये बेज, पीच रोड,न्यूड आणि बेसिक छटा वापरल्या जातात.

 

बेस-

सर्वप्रथम त्वचेवर लाईटवेट वॉटर बेस मायश्चरायझर लावावे.
(Water Based Moisturizer) त्यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा दिसून येणार नाही.

कंसीलर
त्यानंतर त्वचेशी मिळत्याजुळत्या कंसीलरचा उपयोग करुन चेहऱ्यावरील डाग आणि काळी वर्तृळे झाकून टाकावीत.

फाऊंडेशन
त्यानंतर चेहऱ्याच्या त्वचेला शोभून दिसेल असे फाऊंडेशन (Wet Beauty Sponge) वापरावे. बोटानेच हे फाऊंडेशन चेहऱ्यावर नीट लावून घ्यावे. गरज वाटल्यास स्पंज ओला करूनही फाऊंडेशन लावता येईल.

आय शॅडो (Eye Shadow)

हल्ली बाजारात आणि ऑनलाईनही वेगवेगळ्या प्रकारच्या आय शॅडो उपलब्ध आहेत. त्यातीलच एक आय शॅडो पेलेट घ्यावे. रिंग फिगरने ते डोळ्याच्या पापण्यांवर लावावे. न्यूड मेकअप करातना शक्यतो बेज किंवा लाईट ब्राऊन आय शॅडो वापरली जाते.

आय लायनर ( (Eye Liner)
न्यूड मेकअपसाठी शक्यतो ब्राऊन लिक्विड आयलायनर वापरले जाते.

भुवया (Eye Brows)

न्यूड मेकअप मध्ये आयब्रो पेन्सिलचा वापर केला जातो.

आयलॅश
आयलॅश कर्लरचा उपयोग करून लॅशेजला आकार दिला जातो.

मस्कारा (Mascara)
नंतर लैशवर डार्क काळ्या किंवा ब्राऊन रंगाचा मस्कारा लावला जातो.

लिपस्टीक

न्यूड मेकअप करताना तुमच्या ओठांच्या रंगापेक्षा गडद रंगाची लिपस्टीक वापरली जाते. बाजारात न्यूड लिपस्टीकही मिळतात. तुमच्या स्किनटोन प्रमाणे ती निवडावी.

लिप ग्लॉस

लिपस्टीक लावून झाल्यावर ओठांवर लिप ग्लॉस लावल्यास लिपस्टीकचा रंग अधिक खुलुन दिसतो.

ब्लश

ब्लशचा रंग नेहमी स्किनटोन प्रमाणे निवडावा.

 

 

 

 

 

 

First Published on: December 30, 2022 8:51 PM
Exit mobile version