Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नयेत या 5 चुका

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नयेत या 5 चुका

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे शुक्रवारी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण सोनं चांदीबरोबरच या दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्यास घरात आर्थिक समृद्धी राहते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, मात्र या दिवशी फक्त सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जात नाही तर अक्षय्य तृतीया देखील शुभ दिवस असल्याचं मानलं जातं. यामुळे या दिवशी काही काम निषिद्ध मानली जातात. अन्यथा अनेक जन्म दारिद्र्य मागे लागते. आर्थिक सुबत्तेऐवजी गरिबीचे वास्तव्य असू शकते. चला तर जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या पाच चुका टाळाव्यात.

अन्नदान

अक्षय्य तृतीयेला तुम्ही कितीही महागड्या वस्तू खरेदी केल्या तरी तुमच्या दारात एखादा भिकारी किंवा गाय अथवा कुत्रा जरी आला आणि अन्न-पाणी न खाता निघून गेला तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. त्यामुळे दारिद्र्य मागे लागते. यामुळे या दिवशी अन्नदान करावे. घरी आलेल्या किंवा दारात आलेल्या व्यक्तीला प्राण्याला खाण्यास द्यावे.

मांसाहार आणि मद्य सेवन निषिद्ध

अक्षय्य तृतीयेला मांसाहार आणि मद्य सेवन करू नये. असे केल्याने तुमचा नवग्रह कमजोर होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ वेळेवर मिळत नाही आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते. या दिवशी सात्विक आहारासोबत ब्रह्मचर्य पाळावे.

कर्ज

कोणताही सण हा आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करावा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज कींवा उधारी घेऊन किंवा देऊन सण साजरा करू नये . असे केल्याने आर्थिक समृद्धी ऐवजी तुमच्या नशिबी दारिद्र्य येते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होऊ शकतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरजूंना मदत करायला हवी. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

नैवेद्य
अक्षय्य तृतीयेला केवळ सोने-चांदी खरेदी करू नका तर दानही करा. विशेषत: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूला नैवेद्य दाखवावा.

अपशब्द बोलू नका

सामान्य दिवसातही अपशब्द वापरू नयेत, या नियमाला अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणाशीही गैरवर्तन करू नये. एखाद्याला दुखावल्याने तुमचे चांगले काम कमी होते, त्यामुळे तुमची समृद्धी गरिबीत बदलू शकते, म्हणून अक्षय्य तृतीयेला कोणाचाही अपमान करू नका.

 

First Published on: May 4, 2024 1:38 PM
Exit mobile version