पूर्वीच्या काळी राण्या-महाराण्या सुंदर दिसण्यासाठी नक्की काय करायच्या?

पूर्वीच्या काळी राण्या-महाराण्या सुंदर दिसण्यासाठी नक्की काय करायच्या?

चंदा मांडवकर :

प्राचीन काळातील राण्या-महाराण्यांच्या सौंदर्याचे वर्णन करणे म्हणजे एखाद्या सौंदर्यवतीच्या प्रेमात पडणे. तसेच आपल्या सौंदर्याने त्या राजांना ही आकर्षित करायच्या. आपले सौंदर्य चिरकाळ टिकून ठेवण्यासाठी त्या काही नैसर्गिक गोष्टींचाच वापर करायच्या. तर आजच्या काळातील महिला सुद्धा राण्या-महाराण्यांच्या ब्युटी टिप्सचा आपल्या दैनंदिन जीवनात खमखास वापर करात. आपल्या सुंदर आणि लांबलचक केसांसाठी असो किंवा आपल्या नितळ त्वचेसाठी असो नवे-नवे प्रोडक्ट्स सध्या महिला वापरतात. परंतु प्राचीन काळात असे काही ब्यूटी प्रोड्क्ट्स नव्हते तरीही राण्या-महाराण्या आपले सौंदर्य कशा पद्धतीने टिकवून ठेवायच्या? त्यांच्या सौंदर्याचे गुपित नक्की काय होते? हेच आपण आज पाहूयात.

अत्तरचा वापर

जुन्या काळात त्या अत्तरचा वापर खुप करायच्या. असे सांगितले जाते की, अत्तरचा वापर केल्याने राजा त्यांच्याकडे आकर्षित व्हायचाच. पण त्यांची त्वचा अत्तरमुळे सुगंधित आणि कोमल व्हायची.

अक्रोड

अक्रोडमध्ये काही गुण असतात ते सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करतात. तर राण्या-महाराण्या सुद्धा आपले सौंदर्य खुलवण्यासाठी खुप अक्रोडचे सेवन करायच्या. त्यामुळे त्यांचे वाढते वय ही लगेच कळून यायचे नाही. आपल्या याच खासयितमुळे त्या राजांना मोहित करायच्या. तसेच अक्रोड खाल्ल्याने त्या तंदुरस्त ही रहायच्या.

 गाढवाचे दुध

ग्रंथांत असे लिहिले गेले आहे की, गाढवाच्या दुधात एंन्टी एजिंग गुण असतात. त्यामुळे राण्या आपल्या कोमल त्वचेसाठी मध, ऑलिव्ह ऑइलसह गाढवाच्या दुधाने स्नान करायच्या. त्यामुळे त्यांच्या त्वचेची चमक ही कायम रहायची.

बियर फेसपॅक

बियर केसांसाठी उत्तम असल्याचे मानले जाते. काही वेळा आपण ऐकले असेल की, बियर तुमच्या त्वचेसाठी उत्तम असते. असे मानले जाते की, जुन्या काळात राण्या-महाराण्या आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून दूधाच्या पावडरमध्ये अंड्याचा सफेद भाग, लिंबूचा रस आणि मदीरा म्हणजेच बियरचा मिश्रण एकत्रित करुन चेहऱ्यावर लावायच्या. त्यामुळे त्यांची त्वचा तरुण आणि कोमल दिसायची.


हेही वाचा :

31 st सेलिब्रेशन पार्टीसाठी असा करा न्यूड मेकअप

First Published on: January 11, 2023 3:34 PM
Exit mobile version