मुलं अभ्यासात कच्ची आहेत? तर वापरा ‘या’ टिप्स

मुलं अभ्यासात कच्ची आहेत? तर वापरा ‘या’ टिप्स

काही मुलांना अशा सवय असते की, तुम्ही त्यांना अभ्यास करायला किंवा लिहायला सांगताच ते रडायला किंवा काहीतरी बहाणा करायला सुरुवात करतात. मुलाला कसेबसे अभ्यासाला बसविले तरी तो अभ्यास करण्याऐवजी इकडे तिकडे बघू लागतो. त्याचे लक्ष अभ्यासाकडे नसते. मुलांच्या या सवयीमुळे त्यांना नीट अभ्यास करता येत नाही आणि मुलं अभ्यासात कच्ची होतात. मुले नापास होण्याची भीती पालकांना वाटू लागते. तुमच्या घरातही असे काही घडत असेल आणि तुमचे मूल अभ्यासापासून दूर पळत असेल, तर जाणून घेऊयात यासंदर्भातील टिप्स.

मुलांना अभ्यासात मदत करण्यासाठी टिप्स

शिस्त आणि अभ्यासात नियम पाळणे –
वाचन आणि लेखनासाठी एक वेळ निश्चित करा आणि त्याला घरात एका ठिकाणी बसून वाचण्यास सांगा. मुलाला दिवसभरात कधीही आणि कुठेही बसून अभ्यास करण्यास सांगू नका. मुलाला शांत, स्वच्छ आणि व्यवस्थित ठिकाणी बसवून शिकवा. अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि मुलाला अभ्यासदरम्यान, फोन, टीव्ही किंवा इतर कोणतेही गॅझेट पाहू देऊ नका.

अभ्यास मनोरंजक बनवा –
मुलांना वाचन आणि लेखन कंटाळवाणे वाटते आणि म्हणूनच मुले टाळतात. अशा परिस्थितीत, पालक आपल्या पाल्याला अभ्यास आणि शिकण्यासाठी काही नवीन पद्धतींचा अवलंब करू शकतात. पुस्तकांव्यतिरिक्त तुम्ही वर्तनमानपत्र, व्यंगचित्रे आणि व्हिडीओचीही मदत घेऊ शकता. विज्ञान आणि पर्यावरणाशी संबंधित विषयांचे ज्ञान वाढविण्यासाठी मुलांना जंगले, विज्ञान केंद्रे आणि प्रदर्शनामध्ये नेले जाऊ शकते.

मुलाला प्रोत्साहन द्या –
तुमच्या पाल्याचा अभ्यास होत नाही म्हणून त्यांना फटकारण्याऐवजी त्यांना अभ्यासासाठी प्रोत्सहीत करणे आवश्यक आहे. मूल जेव्हा चांगले अभ्यास करते तेव्हा त्याची नक्कीच स्तुती करायला हवी. यामुळे त्यांना आनंद होईल आणि दुसऱ्या दिवशी अभ्यास करण्याची प्रेरणाही मिळेल.

मुलांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त या गोष्टीही महत्वाच्या –

  1. अभ्यासासोबतच मुलांना खेळण्यासाठी भरपूर वेळ द्या.
  2. मित्रांना भेटणे, जमिनीवर खेळणे आणि बाहेर फिरायला जाणे यामुळे मुलाला वर्तवणूक कौशल्ये शिकण्यास मदत होते.
  3. तुमच्या मुलगा अभ्यासात कच्चा असला तरी त्याची तुलना इतर कोणत्याही मुलाशी करू नका. प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याच्या गतीने अभ्यास करते. म्हणून तुलना करणे टाळा.
  4. तुमच्या मुलाचे रिझल्ट खराब आल्यास, इतरांसमोर त्याला शिवीगाळ करणे, ओरडणे टाळा. असे केल्याने मुलाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

 

 

 


हेही वाचा : मुलींना वाढविताना मुलींमधील स्त्रीपण जपणे महत्वाचे

 

First Published on: March 12, 2024 4:56 PM
Exit mobile version