बाळाला जेवण भरवताना हे टाळा

बाळाला जेवण भरवताना हे टाळा

Baby

लहान बाळांचे सांगोपन करताना घरातील मोठ्यांनी संयम आणि सतर्कता राखणे आवश्यक आहे. घरातील लहान बाळाची काळजी घेताना नकळत आपल्याकडून आरोग्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होते. या एक सवयींपैकी एक सवय सर्वच घरात सर्रासपणे आढळून येते, ती म्हणजे, बाळाला भरवताना त्याचे तोंड पोळू नये म्हणून आपण त्याच्या जेवणार अलगद फुंकर मारतो. मात्र, तुम्ही मारलेली फुंकर त्याच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
जेवणावर फुंकर मारणे का टाळावे?

फुंकर मारताना आपल्या तोंडावाटे अनेक जिवाणू बाहेर पडतात. त्यात जर तुमचे दात किडले असतील तर तुम्ही अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण की, जर तुमचे दात किडले असतील तर तुमच्या केवळ एका फुंकीने तुम्ही तुमच्या बाळाला नकळत दातांचे दुखणे भेट देता.

हो, दात किडण्यासाठी कारणीभूत ठरणारे जिवाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे सहज पसरवले जातात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या बाळाच्या जेवणावर फुंकर मारत असाल तर सावधान. कारण या फुंकीद्वारे दात किडण्यासाठी कारणीभूत जिवाणू अन्नामध्ये मिसळून तुमच्या बाळाला दात किडण्याची समस्या देऊ शकते. दात किडण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या स्ट्रेप्टो कोकस मुटान्स नामक जीवाणूशी लढा देण्यास लहान मुलांचे दात कमकुवत असतात. लहान मुलांच्या दातांमध्ये अडकलेले अन्नघटक खाताना स्ट्रेप्टो कोकस मुटान्स विशिष्ट प्रकारचे आम्ल दातांवर सोडतात. या जिवाणूंच्या संपर्कात आल्यास मुलांचे दात पूर्ण विकसित होण्याआधीच दात किडण्याची प्रक्रिया सुरू होते.

एका ऑस्ट्रेलियन अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की लहान मुलांना स्ट्रेप्टो कोकस मुटान्स या जिवाणूंची भेट अनेकदा त्यांच्या मातांकडूनच मिळते. आईने लहान मुलांच्या चमच्याने जेवणे, लहान मुलांच्या तोंडावर किस करणे, लहान मुलांच्या जेवणावर फुंकर मारणे या सवयीने मुलांमध्ये स्ट्रेप्टो कोकस मुटान्स जिवाणू पसरविले जातात. त्यामुळे लहान मुलांना जेवण भरविताना आईने काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा लहान मुलांच्या जेवणावर चुकूनही फुंकर मारू नका. तसेच लहान मुलांच्या जेवणाच्या चमच्याने स्वतः जेवण करू नका. त्याचप्रमाणे स्ट्रेप्टो कोकस मुटान्स जीवाणू लहान मुलांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी लहान मुलांची जीभ, दात आणि तोंड ओल्या सुती कापडाने पुसत रहावे. असे केल्याने तुम्ही तुमच्या लहान मुलांना चांगल्या आरोग्यदायी सवयी तर लावताच पण त्यांना निरोगी आयुष्याची भेटही देता.

First Published on: April 29, 2019 4:29 AM
Exit mobile version