Good Touch आणि Bad Touch बद्दल मुलांना कसे सांगाल?

Good Touch आणि Bad Touch बद्दल मुलांना कसे सांगाल?

आपल्या मुलांनी सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगावे हे प्रत्येक पालकाला वाटत असते त्यामुळे ते त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न ही करतात. तर मुल हे जो पर्यंत लहान असते तो पर्यंत ते आपला अधिक वेळ पालकांसोबत घालवतात. परंतु सध्याची बदलती जीवनशैली पाहता आणि आपण दररोज मुलांसोबत होणाऱ्या विविध घटना पाहता त्यांच्याबद्दल पालक अधिकच काळजी करतात. खासकरून मुलींबद्दल हा विचार अधिक केला जातो. घराबाहेर पाठवताना किंवा एखाद्या नव्या व्यक्तीसोबत पाठवताना भीती वाटते. मुलांना जरी काही कळत नसले तरीही पालकांना सर्वकाही कळत असते. समाजात सध्या ऐवढी असुरक्षितता निर्माण झाली आहे की, जरी एखादया मुलासोबत कोणतीही घटना घडली की त्याचा संदर्भ आपल्या मुलासोबत जोडून पाहतात. अशातच पालक ही मुलांना रात्रीच्या वेळी सुद्धा घराबाहेर पाठवण्यास नकार देतात.

पण मुलांना योग्य वेळी आणि योग्य वयात काही गोष्टींबद्दल सांगणे गरजेचे असते. मुलं जसजशी मोठी होतात तेव्हा त्यांना काही गोष्टी कळू लागतात. काही गोष्टी करण्याची त्यांची इच्छा होते. पालक ही त्याला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नाही याबद्दल वेळोवेळी सांगत राहतात. या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तींशी कसे वागावे हे सुद्धा शिकवतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कोणत्या हेतूने स्पर्श केला आहे हे सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना वेळीच सांगितले पाहिजे. जेणेकरून मुलं चुकीच्या गोष्टीवेळी वेळीच बोलू शकतील. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलासोबत एक मित्रत्वाचे नाते तयार केले पाहिजेच. पण त्याला गुड टच आणि बेंड टच मधील नेमके अंतर काय हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

गुड टच आणि बॅड टच

तुमच्या मुलांना समजवा की, जर तुम्हाला एखादा व्यक्ती स्पर्श करत असेल आणि तुम्हाला तो स्पर्श आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हटले जाते, जसे की, एखादा व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ही बॅड टच बोलले जाते.

या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रेमाने स्पर्श करत असेल, किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल किंवा प्रेमाने गळाभेट घेतली तर त्याला गुड टच मानले जाते.

शरिराच्या अवयवांची माहिती दया

मुलांना त्यांच्या अवयवयांची माहिती दया पालकांनी मुलांना असे सांगितले पाहिजे की, जर एखादा व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे. किंवा आपल्या पालकांना सांगितले पाहिजे. त्याचसोबत त्यांना सांगावे की, घाबरुन शांत बसू नये.

चुकीच्या व्यवहाराबद्दल सांगा

खेळताना त्यांना जर एखाद्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध करण्यास मुलांना सांगा, जसे की, जबरदस्तीने तुम्हाला उचलण्याचा किंवा तुमच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीपासून लगेच दूर जा. शाळेत असो किंवा आपला एखादा मित्र असो त्याला तुमच्यासोबत असे करण्यापासून दूर ठेवण्यास सांगा.

मुलांना नाही बोलण्यास शिकवा

मुल ही मनाने खुप साधीभोळी असतात. त्यांना एखाद्याने जरी प्रेमाने खायला किंवा एखादे खेळणे दिले तरी त्यात आनंद व्यक्त करतात अशातच काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मुलांना असे सांगा की, जर एखाद्या बाहेरच्या किंवा अज्ञात व्यक्तीने तुम्हाला काहीही दिले तरीही त्याला नाही बोला

मुलांसोबत वेळ घालवा

काही वेळेस पालक कामात ऐवढे व्यस्त असतात की त्यांना आपल्या मुलांकडे लक्षच देता येत नाही. त्यामुळे मुल अशा कारणास्तव आपल्या मनातील काही गोष्ट सांगू शकत नाहीत. त्यामुळे मुलांसोबत थोडा वेळ घालवत जा. त्यांच्यासोबत बातचीत करा. शक्य असल्यास मुलांना दररोज एक पान डायरी लिहिण्याची सवय लावा.

मुलांच्या वागण्याकडे लक्ष दया मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल कळत नसते. त्यामुळे ते एखाद्याला खुलेआमपणे आपल्या मनातील गोष्ट सांगत नाही. ते आतमधल्या आतमध्ये त्या गोष्टी साठवून ठेवत त्रस्त होतात. त्यांचे अभ्यासात ही काही वेळेस लक्ष लागत नाही. अशी स्थिती त्यांच्या शारिरीक विकासावर प्रभाव टाकते. त्यामुळे आपल्या मुलाच्या वागण्याकडे ही पालकानी लक्ष दिले पाहिजे. जर तुमचे मुलं अधिक शांत राहत असेल किंवा स्वतःच्याच धुंदीत राहत असेल तर त्याला त्याबद्दल विचारा.

मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करु नका

काही वेळेस आपल्याला वाटते की, मुलींनांच गुड टच आणि बेंड टच बद्दल सांगितले पाहिजे तर जसे नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलाला सुद्धा जरूर सांगा.

पालकांनी पुढील काही गोष्टीवर ही लक्ष दया


हेही वाचा :

महिलांनी वाढत्या वयासह तंदुरुस्त आणि सुंदर दिसण्यासाठी करा ‘ही’ योगासनं

First Published on: January 25, 2023 5:07 PM
Exit mobile version