कच्च्या केळ्याचे कटलेट

कच्च्या केळ्याचे कटलेट

कच्च्या केळ्याचे कटलेट

बऱ्याचदा नाश्ताला काय कराव, असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्यात काहीतरी चटकदार, आंबट गोड असे खावेसे वाटते, अशावेळी खमंग असे कच्च्या केळ्याचे कटलेट करु शकता.

साहित्य

२ कच्ची केळी
१ उकडलेला बटाटा
१/४ कप साबुदाणा
२ टेस्पून उपासाची भाजणी
३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
३ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीरची पेस्ट
१ टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तूप किंवा शेंगदाणा तेल

कृती

साबुदाणा धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. त्यानंतर तो साबुदाणा झाकण ठेवून ४ तास झाकून ठेवावा. नंतर साबुदाणा निट भिजला कि केळे सोलून किसून घ्यावे. नंतर साबुदाणा, किसलेले केळे, उकडून कुस्करलेला बटाटा, उपासाची भाजणी, शेंगदाणा कूट, मिरचीपेस्ट, लिंबू रस आणि मीठ एकत्र करावे. त्यानंतर निट मळून गोळा तयार करावा. हा गोळा समान विभागून मध्यम आकाराचे कटलेट बनवावे आणि आवडीप्रमाणे त्याला आकार द्यावा. त्यानंतर तेल किंवा तूप गरम करावे आणि तयार कटलेट मध्यम आचेवर तळून घ्यावे. हे कटलेट गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

First Published on: January 25, 2020 6:45 AM
Exit mobile version