पौष्टिक बनाना मिल्कशेक

पौष्टिक बनाना मिल्कशेक

बनना मिल्कशेक असं कोल्डड्रिंक आहे जे लहानांपासून मोठे कोणालाही आवडू शकतं. स्वादिष्ट लागणारे हे मिल्कशेक आरोग्यासाठी तेवढेच पौष्टिक मानले जाते. बनाना मिल्कशेक झटपट तयार होतो. त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

१ कप कापलेले केळं, १ कप दूध, १\४ कप क्रीम आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप क्रश केलेला बर्फ

कृती

पौष्टिक बनाना मिल्कशेक तयार करण्यासाठी केवळ ७ते८ मिनिटे लागतात. वरील सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरच्या माध्यमातून स्मूद ब्लेंड करून घ्या. मिल्कशेक जसे हवे त्या स्वरूपात ठेवा. घट्ट हवे असल्यास त्यात मिल्क पावडर मिक्स करा. त्यानंतर त्यात बर्फ घालून काहीवेळ फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवा. नंतर थंडगार पौष्टिक बनाना मिल्कशेक पिण्यास तयार.

बनाना मिल्कशेक पिण्याचे फायदे

केळात अधिक प्रमाणात फायबर असल्याने दमा, कॅन्सर, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. यासर्व समस्यांना रोकण्यासाठी नुसते केळं खाणं किंवा हे असा मिल्क करून पिणे फायद्याचे ठरू शकते. तसेच लहान मुलांकरता हे मिल्कशेक एक पौष्टिक आणि हेल्दी ड्रिंक म्हणून देता येऊ शकते.

First Published on: October 13, 2019 6:30 AM
Exit mobile version