सावधान ! एनर्जी ड्रिंक पिण्यास बेतू शकते जिवावर, संशोधनातील निष्कर्ष

सावधान ! एनर्जी ड्रिंक पिण्यास बेतू शकते जिवावर, संशोधनातील निष्कर्ष

सावधान ! एनर्जी ड्रिंक पिण्यास बेतू शकते जिवावर, संशोधनातील निष्कर्ष

अनेक युवकांमध्ये आजकाल एनर्जी ड्रिंकचे फॅड खूप वाढत चालले आहे. व्यायाम केल्यावर, थकवा आल्यास,आवड म्हणून किंवा एखादी पार्टी असो अनेकदा एनर्जी ड्रिंक तिथे हमखास उपलब्ध असते. पण एनर्जी ड्रिंक अतिप्रमाणात पिल्यास त्याच्या दुष्परिणामांना देखील सामोरे जावे लागते. असे म्हंटले जाते कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा संकटाला आमंत्रण देतो. याचप्रमाणे BMJ जर्नल मधे प्रकाशित झालेल्या एका अहवाला नुसार लागोपाठ दोन वर्षे २१ वर्षापुढील मुलांवर संशोधन करण्यात आले. जे लोक दररोज ४ कॅन किंवा त्यापेक्षा जास्त एनर्जी ड्रिंक पितात अशा लोकांना हृदयाच्या समस्यांना सामोरे जावे लागते, असे या अभ्यासातून उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक घेणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.

संशोधांनादरम्यान या संपुर्ण अभ्यासासाठी व्यक्तींची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. पण या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे काम केल्यास धाप लागणे ,श्वास घेण्यास त्रास होणे,वजन कमी होणे अशी लक्षणे आढळून आली. लक्षणे आढळलेला व्यक्ती हा २ वर्षांपासून एनर्जी ड्रिंक घेत असल्याचे सांगण्यात आले. अभ्यासासाठी एनर्जी ड्रिंकच्या प्रमाणाची मोजणी केली असता, एका कॅन मध्ये १६० मिली ड्रिंक असते. पण या ड्रिंक मध्ये कॅफेन आणि टॉरिन (एक प्रथिने) आणि इतरही काही घटकांचा समावेश असतो. अहवालात सादर करण्यात आल्याप्रमाणे या ड्रिंक मध्ये असलेले घटक यांमुळे हृदयाच्या समस्येत भर पडते.

 

सर्वेक्षण झालेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती तीन महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल झाला असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान एके दिवस त्याला अचानकपणे जोरात हृदय धडधडणे,शरीर थरथर कापणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्याचा अनुभवही त्याने सांगितला. या आपत्कालीन स्थितीत त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळाली नाही . काही वेळाने रुग्णालयात पोहचल्यावर त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि चाचणी मध्ये त्याची किडनी आणि हृदय यावर गंभीर परिणाम झाल्याचे कळले. परिणामी या व्यक्तीला आपले विद्यापिठातील शिक्षणही अर्धवट सोडावे लागले.

तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार या व्यक्तीला आता किडनी ट्रान्सप्लांटची गरज नसल्याचे डॉक्टरांनी संगितले आहे. योग्य औषधोउपचाराने त्याच्या तब्येतीत हळू हळू सुधारणा होत आहे. जर त्याने एनर्जी ड्रिंक पिणे पुर्णपणे बंद केले तर त्याचे शरीर पुर्णपणे औषधोपचारास सहकार्य करू शकते असे मत डॉक्टरांनी मांडले आहे. या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये झपाट्याने सुधारणा होऊ शकते असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. संशोधनादरम्यान अनेक व्यक्तींना यापेक्षाही जास्त समस्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.


एनर्जी ड्रिंक उच्च रक्तदाब वाढवण्यास सुद्धा करणीभूत ठरत आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की एनर्जी ड्रिंक पासून होणार्‍या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या धोक्यांविषयी सावधान रहा. एनर्जी ड्रिंक पिण्याचे व्यसन लावून घेऊ नका. अन्यथा ही एनर्जी ड्रिंकची सवय तुमच्या जिवावर सुद्धा बेतू शकते असा निष्कर्ष अहवालात मांडण्यात आला आहे.


हे हि वाचा – Work From Homeमुळे मान व पाठीच्या दुखण्याने हैराण, करायचं तरी काय?

First Published on: April 20, 2021 4:42 PM
Exit mobile version