हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

थंडीला सुरुवात झाली आहे. या थंडीत आपल्या त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. कारण अशा दिवसात त्वचा कोरडी होते. यामुळे आपण बऱ्याचदा बाहेरील उत्पादनाचा वापर करुन त्वचा मुलायम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यामुळे त्वचा अधिक खराब होते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

उटणे

हिवाळ्यात त्वचेला उटणे किंवा डाळीचे पीठ लावावे. यामुळे चेहरा मुलायम होतो.

नारळाचे तेल

थंडीत रात्री झोपताना चेहऱ्याला नारळाचे तेल लावून झोपावे. हे तेल त्वचेत मुरते यामुळे कोरडेपणा कमी होतो.

व्हिनेगर

कोरड्या त्वचेवर व्हिनेगर अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरडेपणा निघून जाण्यासाठी हाताला व्हिनेगर लावा आणि हात कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे हात मुलायम होण्यास मदत होते.

First Published on: December 1, 2020 6:10 AM
Exit mobile version