मधुमेहासह इतर समस्यांवरही ‘दुधी भोपळा’ ठरतो फायदेशीर

मधुमेहासह इतर समस्यांवरही ‘दुधी भोपळा’ ठरतो फायदेशीर

बरीच मंडळी हिरव्या भाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. मात्र, याच हिरव्या भाज्या सर्वच आजारांवर रामबाण उपाय म्हणून कार्य करतात. हिरव्या भाज्यांमध्ये आपण दुधी भोपळा हा सहजासहजी खात नाही. मात्र, हा दुधी भोपळा मधुमेहासह इतर समस्यांवरही फायदेशीर ठरतो.

त्वचा तजेलदार होते

दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

मधुमेह

दुधी भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचे प्रमाण असल्याने हे सहज पचूनही जाते आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो.

पायांची जळजळ

दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते.

मूळव्याध

मूळव्याधाच्या आजारावरदेखील दुधी उपयोगी पडतो. त्यासाठी दुधी भोपळ्याचे साल सुकवून त्याचा बारीक भुगा बनवून घ्या आणि रोज सकाळी-सायंकाळी एक चमचा थंड पाण्यासोबत याचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

पोटांचे विकार

पोटाच्या विकारांवर दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याला मंद आचेवर भाजून त्याचे भरीत बनवा. त्यातील रस पिळून काढून त्यामध्ये थोडी साखर घालून प्यायल्यामुळे लिव्हर आणि पोटाच्या विकारांवर फायदा होता. गरम पाण्यात उकळून घेतलेल्या भोपळ्याचा रायता खाल्ल्याने अतिसारावरदेखील आराम मिळतो.

First Published on: May 28, 2020 6:00 AM
Exit mobile version