दह्याने खुलवता येईल चेहऱ्याचे सौंदर्य

दह्याने खुलवता येईल चेहऱ्याचे सौंदर्य

सर्वांच्या घरात नेहमी असणारा एक पदार्थ म्हणजे दही. याच दहीचे आरोग्याला लाभणारे अनेक फायदे तर तुम्हाला माहितीच असतील, पण ह्या दहीच्या वापराने तुमचे सौंदर्य हे खुलत असते. म्हणूनच या दहीचे फायदे जाणून घेऊया.
दही खूप घरगुती उपायांसाठी प्रसिद्ध आहे. सुंदर दिसण्यासाठी नेहमी बाजारातील महागडे क्रीम किंवा कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा हा स्वस्त आणि नैसर्गिक, घरगुती उपाय नक्कीच करायला हरकत नाही.

चेहऱ्याच्या सौंदर्याकरिता नैसर्गिक आणि घरगुती उपाय

दही आणि मधाचे मिश्रण
तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढावे अशी जर तुम,ची इच्छा असेल तर, अर्धा चमचा मधामध्ये एक चमचा दही मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. मधाचा नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून उपयोग होतो. ह्यामुळे तुमच्या त्वचेला पौष्टिक गोष्टी मिळतात.

दही आणि हरभऱ्याचे पीठ
एक चमचा दह्यामध्ये एक चमचा मोठ्या हरभऱ्याचे पीठ मिक्स करा, त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा आणि मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २० मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. ह्या मिश्रणातून त्वचा मुलायम होत असते.

मुलतानी माती आणि दही
१ चम्मचा दह्यामध्ये एक चमचा मुलतानी माती मिक्स करा. या मिश्रणामध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. ह्या पॅकमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे कमी होऊन त्वचा निखळते.

केळी, अंडे, दही, आणि हरभऱ्याचे पीठ
एक केळ कुस्करा त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा दही, हरभऱ्याचे पीठ आणि अंड्याचा पिवळा भाग मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. एका तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि हे मिश्रण योग्य प्रमाणात घ्या. ह्यामुळे त्वचा ही खूप मुलायम व स्वस्थ बनते.

दही आणि ओट मिल पावडर
एक चमचा दह्यामध्ये दोन चमचे ओट मिल पावडर मिक्स करा. हे मिश्रण घेऊन चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करा. ३० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. या पॅकमुळे चेहऱ्यावर छान तकाकी येते.

First Published on: May 19, 2019 8:10 AM
Exit mobile version