‘या’ तेलांनी केसांना मिळते सर्वाधिक पोषण

‘या’ तेलांनी केसांना मिळते सर्वाधिक पोषण

'या' तेलांनी केसांना मिळते सर्वाधिक पोषण

बऱ्याचदा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण केसांना तेल लावतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, कोणते तेल लावावे. ज्याचा आपल्या केसांना अधिक फायदा होतो. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे काही तेल आहेत, जे आपल्या नजरेसमोर नेहमीच असतात. पण, आपण त्याचा वापर करणे शक्यतो टाळतो. परंतु, तुम्ही या तेलांचा वापर केल्यास तुमचे केस लांबसडक आणि मजबूत राहण्यास नक्की मदत होईल.

खोबरेल तेल

सामान्यतः अनेकजण केसांना खोबरेल तेल लावतात. या तेलामुळे केसांना पोषण मिळून केसांची वाढ वेगात होते. त्यामुळे केमिकल्सयुक्त तेल लावण्याऐवजी या तेलाचा वापर करा. यामुळे चांगला फायदा होण्यास मदत होईल. कारण खोबरेल तेलात मॅग्नीशियम, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम इत्यादी घटक या तेलांमध्ये असल्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. दररोज या तेलाचा वापर केल्यास केस मुलायम आणि नरम बनतात.

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह या फळापासून बनवलेले तेलदेखील केसांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर आहे. या तेलामुळे केस मॉइश्‍चराइज़ होते. विशेष म्हणजे रुक्ष केसांसाठी हे तेल कंडिशनरचे काम करते आणि केसांना नवीन चमक आणि ऊर्जा देते. यामध्ये मध मिसळून केसांना लावल्यास केस शायनी होतात.

बदाम तेल

बदामाचे तेलही केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या तेलाचा दररोज उपयोग केल्यास केस मऊ, काळेशार आणि दाट बनतात. तसेच या तेलामुळे केसांना बळकटी मिळते आणि केसगळती थांबते.

एरंडाचे तेल

एरंडेल तेल केसांसाठी फायदेशीर आहे. या तेलाने केसांना चांगले मालिश करावे. त्यानंतर डोके अर्ध्या तासासाठी टॉवेलने घट्ट बांधावे. अर्ध्या तासानंतर टॉवेल सोडून केस हलक्याशा कोमट पाण्याने धुवावेत. असे केल्याने केस दाट होतात.

First Published on: July 15, 2020 6:54 AM
Exit mobile version