स्वादिष्ट भरली वांगी

स्वादिष्ट भरली वांगी

स्वादिष्ट भरली वांगी

अनेकांना वांग्याची भाजी आवडते. अशावेळी जर त्यात विविधता आणून भाजी केल्यास अधिक छान लागते. चला कर आज आम्ही तुम्हला भरली वांगी कशी करायची ते सांगणार आहोत.

साहित्य

६-८ मध्यम आकाराची वांगी
१ मोठा कांदा
२ छोटे चमचे मालवणी मसाला
१ छोटा चमचा पांढरे तिळ
१/२ छोटा चमचा जिरे आणि धणे पूड
तेल
हळद
कोथिंबीर
चवीनुसार मीठ

कृती

एका भांडयात थोडेसे तेल गरम करून त्यात कांदा लालसर भाजून घ्यावा. त्यात ओलं खोबर घालून वाटण लालसर भाजून घ्यावे. या वाटपात शेंगदाण्याच कूट, तिळ, जिरे आणि धणे पूड, मालवणी मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घालून सारण चांगले एकजीव करावे. त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून घ्यावी. देठांना जर काटे असतील तर काढून टाकावे. वांग्यांना मधून चार काप द्यावे. पूर्ण फोडी करू नये कारण त्यात सारण भरायचे आहे. सारण वांग्यात भरावे.
त्यानंतर एका भांडयात तेल गरम करावे. एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी. थोडीशी लालसर भाजून घ्यावी. वरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे. थोडेसे पाणी घालावे. मध्येमध्ये वांगी परतत राहावी. मंद गॅसवर शिजू दयावे. वरून झाकण ठेवावे. या झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात. हे पाणी वांग्यात घालावे. वांगी शिजली कि वरून छान कोथिंबीर घालावी. भरलेली वांगी चपाती किंवा भाकरी सोबत खाण्यास घ्यावी.

First Published on: March 28, 2020 6:30 AM
Exit mobile version