नखांनी लावा ओठांना लिप्सस्टिक

नखांनी लावा ओठांना लिप्सस्टिक

नेल आर्ट

हल्ली नेल आर्टची क्रेझ तरुणांमध्ये आहे. विविध रंगाने नख रंगवून किंवा त्यावर नक्षीकाम करणे यालाच नेल आर्ट म्हणतात. दरवेळी नेल आर्टचे नवीन प्रकार लोकांसमोर येत असतात. मात्र रशियातील मॉस्को येथे नखांना चक्क लिपस्टिक लावण्यात आली आहे. मुलींना जर लिपस्टिक कमी पडली तर त्या आपल्या नखाला लागलेल्या लिप्सस्टिकचा वापर करु शकतात . याचाच एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. मॉस्कोच्या सनी सलूनमध्ये ही करामात करण्यात आली आहे. याच्याच विविध पद्धती म्हणून नखांना मेकअपचा ब्रशही लावण्यात आले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित झाल्यानंतर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.

नखरेल शोभा

नखांना फक्त नेलपेंट लावणे ही आता जुनी फॅशन समजली जाते. काही वर्षांपूर्वी सुरु झालेली नेल आर्टची फॅशन चांगलीच लोकप्रिय झाली आहे. लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम मॅचिंग कपड्यांबरोबर मॅचिंग नख ही असणे आवश्यक झाले आहे. मॅचिंग नखांवर अनेकदा बारीक नक्षीकामही केले जाते. या नक्षीकाममुळे नखे अजून शोभून दिसतात.

 

First Published on: November 25, 2018 4:09 PM
Exit mobile version