सकाळचा नाश्ता फायद्याचा!

सकाळचा नाश्ता फायद्याचा!

सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता करणे हे उत्तम आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. म्हणून सकाळी उठल्यानंतर एक तासात नाश्ता करायला हवा. नियमित नाश्ता केल्याने मेंदूला चालना मिळते व एकाग्रता वाढावयासदेखील फायदेशीर ठरते. न चुकता सकाळची न्याहरी केल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. सकाळी नाश्ता केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.

*सकाळचा नाश्ता करताना त्यात प्रथिने, खनिजे, व्हिटॅमिन,फायबर,कार्बोहायड्रेट इत्यादी घटकांचा समावेश असेल याचा विचार करा, तसेच भाज्या, फळं, दूध, मोड आलेले कडधान्य, पनीर, दही, सालीच्या डाळी इत्यादींचा समावेश करा. सकाळच्या वेळी हलका परंतु पौष्टिक असेल अशा नाश्त्याला प्राधान्य द्या.

*सकाळचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट केल्यास होणारे काही फायदे                                                              जे लोक सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट करत नाहीत, ते लोक त्यांच्या स्वत:च्या शरीराला खूप नुकसान पोहचवतात. सकाळी तुम्हाला भूक असो वा नसो ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. सकाळी केलेल्या ब्रेकफास्टमुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत होते.

*सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. यामुळे तुमचे आयुष्यही वाढते. हृदयरोग, अल्सर, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

*रात्रीच्या जेवणानंतर सकाळी ब्रेकफास्टपर्यंतचे अंतर खूप जास्त असते. अशात शरीराला एनर्जी देण्यासाठी आणि अधिक एनर्जेटीक राहण्यासाठी ब्रेकफास्ट अत्यंत आवश्यक आहे.

*दररोज ब्रेकफास्ट केल्याने सततच्या हार्टच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.

*सकाळी ब्रेकफास्ट करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

First Published on: February 26, 2019 5:01 AM
Exit mobile version