क्रोनिक किडनी डिसीज आणि उपचार (भाग-१)

क्रोनिक किडनी डिसीज आणि उपचार (भाग-१)

भारतातील क्रोनिक किडनी डिसीजचा (सीकेडी) उद्भव हा मागील दशकभराच्या कालावधीत दुप्पट झाला आहे आणि देशातील पाच लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना या आजाराचे निदान झाले आहे. यातील फक्त काहीजणांना किडनी ट्रान्सप्लान्ट करणे शक्य झाले आहे. सीकेडीचा वेळेत प्रतिबंध, शोध आणि उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या, खासगी आरोग्यसेवा क्षेत्राकडून ८० टक्के रेनल रिप्लेसमेंट थेरपी (आरआरटी) दिली जाते. भारतात एंड स्टेज रेनल डिसीज (ईएसआरडी)च्या मुलभूत आणि वयानुसारच्या घटना प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे अनुक्रमे १५१ आणि २३२ असल्याचे दिसले आहे. आजही, भारतातील आरआरटीची गरज असलेले ९० टक्क्यांपेक्षा अधिक रूग्ण उपचार परवडत नसल्यामुळे निदान झाल्यापासून काही महिन्यांत मरण पावतात आणि आरआरटी सुरू करणाऱ्या रूग्णांपैकी ६० टक्के रूग्ण आर्थिक कारणांमुळे उपचार थांबवतात.

क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे…

क्रोनिक किडनी डिसीजला (सीकेडी)ला क्रोनिक रेनल फेल्युअर (सीआरएफ) असेही म्हटले जाते आणि ते मूत्रपिंडाचे कार्य टप्प्याटप्प्याने बंद पाडते. मूत्रपिंडांचे नुकसान होते आणि शरीराच्या मेटाबोलिक कचऱ्याचे फिल्टरेशन शक्य होत नाही तेव्हा हे घडून येते. सीकेडीच्या सुरूवातीच्या टप्प्यात व्यक्तींमध्ये काही चिन्हे किंवा लक्षणे दिसतात, परंतु मूत्रपिंड मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त झाल्याशिवाय आजार स्पष्टपणे दिसून येत नाही.

आजार पुढील टप्प्यावर पोहोचतो तेव्हा द्रवपदार्थ, कचरा आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळ्या अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचतात आणि त्या शरीराचे गंभीर नुकसान करू शकतात. सीकेडी वेगाने होऊ शकतो आणि मूत्रपिंड अंतिम टप्प्यात नुकसान करू शकतो. हे डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय जीवघेणे ठरू शकते.

धोके आणि प्रतिबंध

क्रोनिक किडनी डिसीज टाळण्यासाठी आजाराची प्रगती थांबवून गुंतागुंत कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे धोक्याचे घटक निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(डॉ. सुरेश के. भगत, युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लान्ट सर्जन)

First Published on: July 7, 2019 6:00 AM
Exit mobile version