Thursday, May 16, 2024
घरमानिनीउन्हाने काहीली झालीये, घसा कोरडा पडलाय, कोल्ड्रिंक पिताय ,वाचा साईड इफेक्टस

उन्हाने काहीली झालीये, घसा कोरडा पडलाय, कोल्ड्रिंक पिताय ,वाचा साईड इफेक्टस

Subscribe

उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आपण थंड पेय पितो.थंड पिल्याने शरीरात थंडावा तर निर्माण होतोच शिवाय तहान भागल्याचं समाधानही मिळतं. यामुळे ताक, पन्हं तर प्यायले जातचं पण काहीजण मात्र थंडगार कोल्ड्रींकला पसंती देतात. पण क्षणभर मनाला आनंद देणारे कोल्ड्रींक्स अनेक आजारही देऊन जातात. यामुळे ऊठसुठ कोल्ड्रींक्स पिणे टाळावे. कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो हे देखील लक्षात ठेवावे.

पोटासाठी वाईट
सर्वप्रथम, थंड पेये पोटासाठी हानिकारक असतात. अनेक शीतपेयांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड असते, जे पोटात गेल्यावर गॅसमध्ये बदलू लागते आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते. याच कारणामुळे कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर ढेकर येते. शीतपेयांमध्ये असणारा हा कार्बन डायऑक्साइड पोटासाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो, ज्यामुळे पोटात तयार होणारे पाचक एंझाइम प्रभावित होतात. या कारणास्तव रात्री कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने छातीत जळजळ होते.

- Advertisement -

रक्तातील साखरेची पातळी वाढते
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सच्या वापरामुळे तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात साखर पोहोचते. अशा स्थितीत कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला मोठी हानी होऊ शकते, कारण ती अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. याशिवाय टाइप-2 मधुमेहाचा धोकाही लक्षणीय वाढतो.

कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढतो, असे संशोधनातून समोर आले आहे. कोल्ड्रींक्स जास्त प्रमाणात घेतल्यास यकृतापर्यंत पोहोचते, नंतर ते ओव्हरलोड होते आणि फ्रक्टोजचे फॅटमध्ये रूपांतर करते. त्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊन डायबटीसचा धोका निर्माण होतो

- Advertisment -

Manini