Relationship Tips : जोडीदाराशी सतत वाद होतात? फॉलो करा या टिप्स

Relationship Tips : जोडीदाराशी सतत वाद होतात? फॉलो करा या टिप्स

सध्याच्या मॉडर्न Lifestyle मध्ये रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही झालं आहे. तुमच्याही नात्यात सतत भांडणं होत असतील तर तुम्ही या काही सोप्या टिप्स वापरा आणि आपले नाते वाचविण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण कोणतंही नातं हे बोलून आणि एकमेकांशी चर्चा करूनच टिकत असतं. नात्यात एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे.

मोकळेपणाने बोला

जोडीदारासोबत वाद टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोकळेपणाने बोला. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दोष देत असेल तर तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. जोडीदाराचा मूड चांगला असेल त्याच्याशी मनमोकळे बोला. अशा वेळी तुम्ही जोडीदाराला नेहमी फक्त चुकाच का पाहतो हे विचारू शकता आणि आपली बाजू समजावून सांगू शकता.

चूक मान्य करा​

जर नाते तुमच्यासाठी महत्वाचे असेल तर चुका मान्य करण्यात काहीच गैर नाही. तुमच्यात सतत भांडण होण्याचे कारण म्हणजे तुम्ही दोघेही तुमच्या दृष्टिकोनावर ठाम आहात. त्यामुळे तुमची चूक मान्य करा आणि नाते पुढे नेण्यासाठी एकमेकांना साथ द्या. तुमच्या चुका तुमच्या नात्यापेक्षा मोठ्या नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा.

शांततेत वाद मिटवा

जेव्हा आपसात वाद होतो तेव्हा लगेचच तुमच्या जोडीदाराची माफी मागा. त्यावेळी वादासाठी तुम्ही कारणीभूत नसाल तरीही ‘सॉरी’ म्हणून तो वाद संपवण्याचा प्रयत्न करा. याचं कारण असं की, त्यावेळी माफी मागितल्याने वातावरण शांत होतं. पुढे वादांना गंभीर वळण लागण्याआधी पूर्णविराम मिळतो. ती वेळ शांततेत निघून गेल्यावर काही वेळाने जोडीदाराच्या मूडचा अंदाज घ्या. योग्य वेळी गोष्टींवर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा.

रागात उत्तरे देणे टाळा

तुमची चूक समजावून सांगिताना तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावत असेल तर मधेच बोलू नका. यामुळे तुमच्या जोडीदाराचा राग वाढू शकतो. अशा स्थितीत तुमच्या जोडीदाराचा राग शांत झाल्यानंतर तुम्ही बोला. यामुळे तुमची बाजू ऐकूण घेण्याची त्याची तयारी असेल.

जुन्या गोष्टींमध्ये अडकू नका

अनेक वेळा आपण भूतकाळातील गोष्टी भांडणात आणत असतो. अशा परिस्थितीत, शांत होण्याऐवजी, मारामारी वाढू शकते. त्यामुळे जुने मुद्दे कधीही भांडणात ओढू नयेत. कारण त्यामुळे हाणामारी कमी होण्याऐवजी वाढू शकते.

गैरसमज दूर करा

जोडीदारासोबत वाद टाळण्यासाठी त्याचे सर्व ऐकून घ्या आणि मग स्वतःसाठी बोला. यामुळे विसंवादामुळे होणारे गैरसमज दूर होतील आणि दोघांना एकमेकांच्या बाजू लक्षात येतील.

__________________________________________________________________

हेही पहा :

First Published on: April 10, 2024 6:34 PM
Exit mobile version