पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासह बेसिक कुकिंग टीप्स

पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासह बेसिक कुकिंग टीप्स

जेवण बनवणे तुम्हाला बोरिंग वाटते का? जर होय असे उत्तर असल तर जेवण बनवण्यापूर्वी काही कुकिंग टीप्स जरुर माहित करुन घेतल्या पाहिजेत. त्यामुळे कमीत कमी वेळात स्वादिष्ट जेवण तुम्ही बनवू शकता. पुढील बेसिक टीप्स प्रत्येक रेसिपी करताना नक्कीच तुमच्या कामी येतील. (Cooking tips)

-कांदा बारीक कापा
कांदा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे तो बारीक चिरुन घ्या.त्याचसोबत तो व्यवस्थितीत शिजवा. तो व्यवस्थितीत शिजला आहे की नाही ते तुम्हाला त्याच्या रंगावरुन कळेल. त्याचा रंग पिंक होईल.

-मध्यम आचेवर बनवा जेवण
जेवण बनवण्याचा बेसिक रुल असा आहे की, कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी त्याची आच मध्यम असली पाहिजे. जेणेकरुन पदार्थांमधील पोषक तत्व नष्ट होत नाही आणि जेवण ही स्वदिष्ट होते.

-भाज्या कापण्यापूर्वी त्या स्वच्छ धुवून घ्या
भाज्या कापण्यापूर्वी त्या स्वच्छ धुतल्या पाहिजेत. तसेच भाज्या कापल्यानंतर ही त्या साध्या पाण्याने धुवाव्यात.

-राई किंवा ऑलिव्ह ऑइल तेल
जेवण बनवण्यासाठी तु्म्ही राई किंवा ऑलिव्ह ऑइलच्या तेलाचा वापर करु शकता. रिफाइंडला बेस्ट पर्याय म्हणून तुम्ही राई किंवा ऑलिव्ह ऑइलचे तेल वापरा. हे तेल आरोग्यासाठी फार पौष्टिक मानले जाते. (Cooking Tips)

-हिरवी मिर्ची
जेवण बनवण्यासाठी तुम्ही नेहमीच हिरव्या मिर्चीचा वापर करावा. प्रयत्न करा की, लाल मिर्चीचा कमीत कमी वापर करा. हिरवी मिर्ची आरोग्यासाठी बेस्ट मानली जाते. तर लाल मिर्चीत काही प्रकारचे केमिकल असतात.


हेही वाचा- घरी लंचसाठी पाहुणे येणार आहेत, मग अशी करा तयारी

First Published on: June 6, 2023 2:46 PM
Exit mobile version