Corona Test: एका सेकंदात निदान करणार कोरोनाची टेस्टिंगची नवीन पद्धत, संशोधकांचा दावा

Corona Test: एका सेकंदात निदान करणार कोरोनाची टेस्टिंगची नवीन पद्धत, संशोधकांचा  दावा

कोरोनाचे निदान करण्यासाठी RT-PCR टेस्ट सर्वात योग्य समजली जाते. मात्र आता संशोधकांनी तयार केलेल्या कोरोना चाचणीमुळे केवळ एका संकदात कोरोनाचे निदान होणार आहे. ही नवीन पद्धत कोरोना विषाणूचा एका सेकंदात शोध घेऊ शकते अशा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी जी पद्धत वापरली जात आहे त्यापेक्षा ही पद्धत सर्वात वेगवान असेल असे संशोधकांकडून सांगण्यात आले आहे. ( new method of testing corona will diagnose in a second,researchers say)

संशोधकांनी सेन्सॉर प्रणालीच्या मदतीने एक नवीन प्रकार विकसित केल आहे. ज्यामध्ये कोरोनाचे निदान करण्यासाठी लाळेचे नमुने घेऊन एका सेकंदात कोरोना विषाणूची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायरल बायोमार्कर्स असणे आवश्यक आहे. हे पॉलिमलेझ चेन रिअँक्शन म्हणजेच PCR किंवा इतर प्रक्रियेद्वारे केले जाऊ शकते,असे व्हॅक्यूम सायन्स अँड टेक्नॉलॉजी बी या मासिकात प्रकाशित करण्यात आले होते.

आतापर्यंत आपल्याकडे RT- PCR टेस्ट सर्वांत अचूक मानली जात आहे. मात्र RT-PCR टेस्टचे रिपोर्ट येई पर्यंत ४-५ दिवसांचा वेळ लागतो. फ्लोरिडा विद्यापिठाशी संबंधीत असलेल्या सिंघाना यांनी असे म्हटले आहे की, RT-PCRटेस्ट पेक्षा  लाळेतून करण्यात येणाऱ्या या नव्या टेस्टला फार कमी वेळ लागतो. बायोसेन्सर पद्धतीने होणारी ही चाचणी अत्यंत सोपी आहे. बायोसेन्सर पट्टी सर्वसाधारणपणे ग्लूकोजा पट्टीसारखी असते. त्यामुळे या नव्या टेस्टच्या पद्धतीमुळे कोरोना टेस्टसाठी लागणारे पैसेही कमी होतील. त्याचप्रमाणे महत्त्वाची बाब म्हणजे या टेस्टद्वारे कोरोना सोबतच इतर रोगांचेही निदान केले जाऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे.


हेही वाचा – स्वॅब टेस्टला पर्याय असलेल्या ‘सलाइन गार्गल टेस्ट’ला ICMRची मान्यता

First Published on: May 20, 2021 7:48 PM
Exit mobile version