Coronavirus : कोरोनाला दूर ठेवायचयं, तर दररोज दालचिनीचा चहा प्या

Coronavirus : कोरोनाला दूर ठेवायचयं, तर दररोज दालचिनीचा चहा प्या

coronavirus : कोरोनाला दूर ठेवायचयं, तर दररोज दालचिनीचा चहा प्या

कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जात आहेत. यातच स्वयंपाकात वापरली जाणारी छोटी दालचिनीही कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. दाचचिनी अन्नपदार्थांची चव वाढविण्याबरोबरच शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यामुळे कोरोना काळात दालचिनीच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढवली जाऊ शकते. दालचिनीमध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी-बेक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.

अन्नपदार्थांची चव वाढविण्यासाठी दालचिनी हा मसालेदार पदार्थ मदत करतो. दरम्यान दालचिनीचा चहा दररोज पिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यात अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्याप्रमाणात आहेत. तसेच टाईप- 2 मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टंटवर दालचिनी चहा रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दालचिनी चहा फायदेशीर मानली जात आहे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन कप दालचिनीचा चहा प्या.

दरम्यान मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठीही दालचिनीचा चहा औषधी ठरत आहे. त्यामुळे शरारातील मधुमेहाचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरत आहे. यासाठी मधुमेहाचा रुग्णांनी जेवण आणि चहामध्ये शक्यतो साखरे ऐवजी दालचिनीचा वापर करा. दरम्यान चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, सुरकुत्या कमी करण्यास दालचिनीचा लेप फायदेशीर ठरतो. यासाठी एक चमचा दालचिनीच्या पाउडरमध्ये २ चमचे नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिसळून तो लेप १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून मालिश करा. व १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर नितळ आणि तेजापणे दिसून येईल.


 

First Published on: May 3, 2021 12:36 PM
Exit mobile version