रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि कोरोनाचा सामना करा!

रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि कोरोनाचा सामना करा!

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या घरगुती टिप्स

सध्या कोरोनाने देशात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, या कोरोनावर मात करायची असेल तर रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर चांगली असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असल्यास, अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

लसूण

हळद, जिरे, धणे आणि लसूण याचा जेवणात वापर करावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

च्वनप्राश

दररोज सकाळी उठल्यानंतर १० ग्रॅम च्वनप्राशचे सेवन करावे. तसेच ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, अशा व्यक्तींनी शुगर फ्री च्वनप्राश खावे. यामध्ये असणारे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हर्बल टी

दररोजच्या खाण्यापिण्यात हर्बल टीचा समावेश करावा. या टी मध्ये तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, आले, मनुका या सर्व पदार्थांचा टी मध्ये वापर करुन त्याचे सेवन करावे. त्यामुळे फायदा होतो.

हळदीचे दूध

सर्दी, खोकला झाला की आपण हळदीच्या दुधाचे सेवन करतो आणि ते फार फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे घशात खवखव होत असल्यास पुदीन्याची पाने खाण्याने किंवा ओव्याची वाफ घेण्यानेही फायदा होऊ शकतो.

लवंग

घशात खवखव किंवा कफ झाल्यास लवंग पावडरमध्ये थोडेसे मध किंवा साखर टाकून दिवसांतून दोन ते तीन वेळा हे मिश्रण खाल्याने फायदा होऊ शकतो.

First Published on: April 10, 2020 6:00 AM
Exit mobile version