Covid 19 Test: लक्षणे असूनही Corona चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? महत्वाची ५ कारणे

Covid 19 Test: लक्षणे असूनही Corona चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? महत्वाची ५ कारणे

Covid 19 Test: लक्षणे असूनही Corona चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? महत्वाची ५ कारणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवीन लक्षणे समोर आली आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मात्र सर्व गोष्टी बदलत आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काहीच लक्षणे नाहीत. मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते. तर ज्यांना लक्षणे आहेत मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह येते. यामुळे बऱ्याचदा कोरोना चाचणीवर अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित राहतात. पण हे असे का? लक्षणे असूनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह का आले? असा प्रश्न सामान्यपणे सर्वांना पडला आहे. असे का होते यामागची महत्त्वाची ५ कारणे जाणून घ्या. जेणेकरुन लक्षणे असूनही कोरोना चाचणी निगेटिव्ह का आली याचे कारण तुम्हाला कळेल.

लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना आहे. जर लक्षणे असणाऱ्याला योग्य उपचार नाही मिळाले तर त्याचा जिवही जाऊ शकतो. दोन प्रकारच्या टेस्ट केस्या जातात. एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट आणि एटिजेन टेस्ट.

RT-PCR टेस्ट म्हणजे काय?

RT-PCR (Real Time Reverse transcription polymer chain Reaction) आरटी पीसीआर टेस्ट करताना नाकातून किंवा घशातून स्वॅब काढला जातो. त्यानंतर स्वॅब एका तरल पदार्थात टाकला जातो. विषाणू त्या स्वॅबमध्ये मिसळला तर तुमची चाचणी पॉझिटिव्ह येते. आरटी पीसीआर टेस्ट अत्यंत योग्य मानली जाते. मात्र तरीही एखाद्याची चाचणी लक्षणे असूनही निगेटिव्ह का येते?

लक्षणे असूनही कोरोना चाचणी निगेटिव्ह येण्याची महत्त्वाची कारणे

अयोग्य प्रशिक्षित लोक

देशात कोरोनाची रुग्ण वाढत गेल्याने चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामळे स्वॅब टेस्ट करण्यासाठी योग्यरित्या ट्रेन न केलेल्या लोकांना बसवले जाते. त्यामुळेही लक्षणे असूनही तुमची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.

नमुने घेण्यात दुर्लक्ष

गोळा केलेले स्वॅब हरवणे, स्वॅब घेताना चुकीच्या पद्धतीने घेणे,घेतलेला स्वॅब ठेवण्यासाठी आवश्यक असलेला पदार्थ नसणे, नमुन्यांची अयोग्य वाहतूक या कारणांमुळेही लक्षणे असूनही तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.

चाचणी करण्यापूर्वी खाणे

कोरोना चाचणी करण्यापूर्वी तुम्ही काही खाल्ले असेल तर त्याचा कोरोना चाचणीवर परिणाम होऊ शकतो.

नमुने खराब होणे

बऱ्याचदा नमुने तपासणीसाठी घेऊन जात असताना कोल्ड चेन योग्यप्रकारे नसल्यास विषाणू मरतो किंवा त्याचे सामर्थ्य कमी होते. यामुळेही लक्षणे असूनही तुमची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.

व्हायरचा कमी प्रभाव

बऱ्याच वेळा आपल्याला ताप येतो मात्र आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्याचा सामना करते. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे असतात मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्यावर व्हायरसचा प्रभाव फार कमी असतो. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.


हेही वाचा – Corona virus Strain: कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमध्ये लक्षणे वेगळी का असतात? जाणून घ्या

 

 

First Published on: April 26, 2021 1:25 PM
Exit mobile version