कढीपत्त्याची ‘चटणी’

कढीपत्त्याची ‘चटणी’

कढीपत्याची 'चटणी'

बहुगुणी कढीपत्ता आपल्या रोजच्या खाण्यात आपण फारसा वापरत नाही. पोहे, उपमा,आमटी आणि भाजीत असा किती वापरतो? चार-सहा पाने फक्त. तेही ऐनवेळी हाताशी असला तर ठीक नाहीतर नसतोच. कारण आपण रोज काही कढीपत्ता आणत नाही. आठवड्यातून एकदा भाजीसोबत आणतो आणि तो दोन दिवसांनी पाने गळून वाळून नाहीतर कुजून गेलेला असतो. तर जास्तीत जास्त कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी आज कढीपत्त्याची ‘ओली चटणी’ कशी करावी हे आपण पाहणार आहोत.

साहित्य

कृती

सर्वप्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टॉवेलवर पसरून कोरडा करावा. आता गँसवर कढई ठेऊन चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी. नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने आणि जीरे, चिंच भाजून घ्यावे. भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ आणि ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसर ठेवावी. आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग – जीरे आणि कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी. अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते. तसेच भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते.


हेही वाचा – ‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता


 

First Published on: December 13, 2019 7:00 AM
Exit mobile version