बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास खुसखुशीत ‘डाळवडे’ नक्की ट्राय करा.
साहित्य
- एक वाटी चणा डाळ
- दोन कांदे बारीक चिरलेले
- ४-५ हिरव्या मिरच्या
- एक चमचा लाल तिखट
- चवीनुसार चिरलेली कोंथिबीर
- चवीपुरतं मीठ
- एक चमचा चाट मसाला
- ओवा
- तळण्यासाठी तेल
कृती
चणा डाळ ४-५ तास भिजत ठेवा. नंतर भिजवलेली डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात वरील सगळे साहित्य एकत्र करून एकजीव करुन घ्या. अखेर त्याचे छोटे-छोटे गोळे करून ते थोडे चपटे करा आणि तळून काढा. हे डाळवडे तुम्ही सॉस किंवा तिखट हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ शकता.