कच्च्या पपईपासून बनवा ‘या’ तीन स्वादिष्ट पाककृती

कच्च्या पपईपासून बनवा ‘या’ तीन स्वादिष्ट पाककृती

पपई आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बरेच लोक असे मानतात की, जर आपल्याला वजन कमी करायचे असेल किंवा पोटाची कोणतीही समस्या दूर करायची असेल तर पपईचे सेवन करणे हा उत्तम उपाय आहे.

पिकलेल्या पपईप्रमाणेच कच्च्या पपईमध्ये एक नाही तर अनेक प्रकारचे पोषक असतात. पण अनेक वेळा घरात जास्त कच्ची पपई असल्याने अनेकजण ती निरुपयोगी समजून फेकून देतात. तर फेकून न देता अशाप्रकारे या तीन सोप्या रेसेपी बनवा.

१. झटकीपट मसालेदार स्नॅक्स बनवा-

साहित्य-
उरलेली पपई – १/२ भाग, बेसन – २ चमचे, गरम मसाला – १/२ चमचा, हळद – १ चमचा, मीठ – चवीनुसार, तिखट – १/२ चमचा, चाट मसाला – १/२ चमचा

कृती-
सर्वप्रथम पपई स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करून चांगले स्वच्छ करा. एका भांड्यात बेसन, मीठ, हळद, चाट मसाला वगैरे घालून नीट मिक्स करून घ्या. आता आवश्यकतेनुसार पपई आणि पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा. यानंतर कढईत तेल टाकून गरम करा. आता तेलात पपईचे काप टाकून तळून घ्या.

२. कच्च्या पपईपासून पराठे बनवा-

साहित्य-
कच्ची पपई – 250 ग्रॅम, मैदा – 3 कप, तेल – 2 चमचे, जिरे – 1/2 टीस्पून, मीठ – चवीनुसार, आले-लसूण पेस्ट – 1/2 टीस्पून, हिरवी मिरची – 2 बारीक चिरून, कोथिंबीर – 1 टीस्पून अजवाइन – १/२ टीस्पून

कृती-
सर्व प्रथम पपई सोलून चांगली किसून घ्यावी. आता किसलेली पपई पाण्यात टाका आणि जास्तीचे पाणी सुकण्यासाठी त्याला 10 मिनिटे शिजवत राहा. ते झाल्यावर एका भांड्यात पीठ ठेवा. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मळून घ्या. यानंतर पपई मधले एक्सट्रा पाणी काढून किसलेला पपई एका भांड्यात ठेवा. आता त्यात लसूण-आले घालून मिक्स करा. यानंतर कढईत तेल टाकून पपईचे मिश्रण काही वेळ परतून घ्या. यांनतर पिठाचा गोळा तयार करून त्यात मिश्रण भरून पराठ्याच्या आकारात लाटून घ्या. मग तव्यावर तेल गरम करून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या.

३. कच्च्या पपईचा हलवा-

 

साहित्य-
कच्ची पपई – 500 ग्रॅम, दूध – 250 ग्रॅम, तूप – 3 चमचे, साखर – 2 चमचे, सुका मेवा – 2 चमचे, नारळ पावडर – 1 चमचे, वेलची पावडर – 1/2 चमचे

कृती-
कच्च्या पपईची खीर बनवण्यासाठी प्रथम त्याची साल काढून चांगली किसून घ्यावी. नंतर कढईत तूप टाकून गरम करून घ्या. यानंतर त्यात किसलेली पपई घाला आणि ती परतून घ्या. पपई चांगली भाजल्यावर त्यात दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवत रहा. काही वेळाने या मध्ये साखर,वेलची पूड आणि खोबरे पूड यांचे मिश्रण घालून चांगले शिजवून घ्या. जेव्हा कढाई मधला हलवा तूप सोडायला लागेल तेव्हा त्यावर ड्रायफ्रुट्स टाका आणि गॅस बंद करा.

First Published on: March 1, 2023 3:20 PM
Exit mobile version