Diabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा ‘हे’ आयुर्वेदिक उपचार फॉलो

Diabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा ‘हे’ आयुर्वेदिक उपचार फॉलो

Diabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा 'हे' आयुर्वेदिक उपचार फॉलो

सध्याच्या वाढत्या धावपळीच्या जगात डॉक्टर प्रत्येक व्यक्तीला आपली लाइफस्टाइल सुधारण्याचा सल्ला देतात. अनेकदा खूप जास्त काम,ताण-तणाव,मानसिक त्रास, दगदग यामुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. वेळीच आजाराचे निदान न झाल्याने अनेकांना उपचारावीणा त्रास सहन करावा लागतो. अशातच आता मधुमेह म्हणजेच डायबिटिज सारख्या आजाराने अनेक व्यक्तींची झोप उडाली आहे. कारण मधुमेहामुळे अनेकदा हृदयावर ,किडणीवर प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. डॉक्टर नेहमीच आपल्याला योग्य आहार घेण्याचा सल्ला देतात कारण एखाद्या व्यक्तीचं ब्लड शुगर लेव्हल असामान्य किंवा सामन्य रेंज पेक्षा जास्त असल्यास तर त्या व्यक्तीला भविष्यात टाईप 2 मधुमेह किंवा हृदयाचा आजाराला सामोरे जावे लागू शकते.(Diabetes control tips: If you have symptoms of diabetes, follow this ‘Ayurvedic treatment’)

असामान्य ब्लड शुगरचा सामना करणाऱ्या लोकांना नेहमीच प्रीडायबिटिक रोगाच्या कॅटगरीत ठेवण्यात येते. कारण यानंतर त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची दाट शक्यता आहे. National Institute Of Health नुसार, प्री-डायबिटीज रिवर्सिबल आहे. याच्या उपचाराकरीता जीवनशैलीत बदल करुन दररोज योग्य आहार, व्यायाम केल्यास यावर मात करता येऊ शकते. आज आपण प्री-डायबिटीज आणि यावर मात करण्यासठी आयुर्वेदीक उपचार कश्याप्रकारे प्रभावी ठरू शकतो हे पाहुयात.

आवळा आणि हळद-

जर डॉक्टरांनी तुम्हाला प्री-डायबिटीज झाली आहे असे सांगितल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार हळद आणि आवळा सारखे आयुर्वेदिक उपचार घेऊन मधुमेहावर मात करण्यास यशश्वी ठरु शकतात. आवळ्याचा ज्युस बनवून किंवा आवळा पावडर मध्ये हळद एकत्र करुन याचे सेवन केल्यास शरीरात इंसुलिन वाढवण्यास मदत होते. तसेच ही उपचार पद्धत मोतीबिंदू तसेच अन्य आजाराशी संबधीत व्यक्तींवर प्रभावी ठरल्याचे आढळून आले आहे.

मेथीचे दाणे-

टाइप 2 डायबिटीजमध्ये मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यास आरोग्यास हितकारक ठरल्याचे दिसून येते. मेथीच्या दाण्यामध्ये सॉल्यूबल फाइबरची मात्रा असते आणि हे डायबिटीज रुग्णांसाठी लाभदायक आहे. तसेच मेथी दाणे पाचन आणि कार्बोहाइड्रेटच्या अवशोषणाची गती योग्य करुन ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदद करते.

याचप्रमाणे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे,योग्य आहार,व्यायाम,योगा,मेडिटेशन करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास नक्कीच मधुमेहावर मात करु शकतो.


हे हि वाचा -Health tips:मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना आता ऑपरेशनची गरज भासणार नाही,वाचा सविस्तर

First Published on: July 16, 2021 7:33 PM
Exit mobile version